सत्यं शिवं सुंदरा - Scholarship Exam

 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा सत्यं शिवं सुंदरा ।।धृ।।

शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा ॥१॥

विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतिरी दयासागरा।।२।।

होऊ आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धीमंत
कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा।।३।।