तलाठी भरती - Scholarship Exam

 तलाठी भरती   अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती

सराव प्रश्न संच 

विभागाचे नाव – महसूल विभाग
पदाचे नाव – तलाठी
वेतन श्रेणी – ९३०० – ३४८००
शैक्षणिक पात्रता – पदवी

तलाठी भरती  अद्याप जाहीर झाली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होईल. महसूल विभागामध्ये तलाठी व मंडल अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदांची भरती करण्यासाठी तलाठी भरती  महत्त्वाची ठरू शकते.

  • तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते.
  • Talathi bharti posts / तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात.
  • तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही.
  • तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.

वयोमर्यादा talathi bharti age limit

talathi bharti / तलाठी पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. तलाठी पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान अठरा वर्षाचा असलाच पाहिजे. जास्तीत जास्त उमेदवाराची वयोमर्यादा 43 असू शकते. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते. मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असू शकते.

शैक्षणिक पात्रता Talathi bharti 2021 qualification

तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा नसली तरी किमान पात्रता पदवी आहे.

लेखी परीक्षा ही एकच असते. लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, अंक गणित हे विषय असतात. प्रत्येक विषयासाठी प्रश्न संख्या 25 असतात. आणि प्रत्येक विषयाला 50 गुण असतात. तर एकूण 100 प्रश्न व 200 गुण असतात. मराठी विषयाला स्तर व दर्जा 12 वीचा असतो. इंग्रजीसाठी पदवीचा अभ्यासक्रम असतो. लेखी परीक्षांची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते.

तलाठी भरती 2021 अभ्यासक्रम

Talathi Exam Syllabus 2021

अ. क्र.विषयप्रश्न संख्यागुण
1.मराठी2550
2.इंग्रजी2550
3.अंकगणित2550
4.सामान्यज्ञान2550
एकुण100200
talathi bharti  syllabus

मराठी अभ्यासक्रम-
समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रिया विशेषण, क्रियापद विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्प्रचारांचा अर्थ, शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे सर्व व्याकरण मराठी विषयासाठी आहेत.

Talathi bharti  list

इंग्रजी अभ्यासक्रम –
Vocabulary, similar words, opposite words, question tag, spelling mistake