भूमध्य सागरी प्रदेश
·
सदाहरित वृक्ष:
पाईन, ऑक्स आणि सायप्रस
·
पानझडी वृक्ष:
सैकमोर्स,
ऑक्स आणि बुकेएस
·
फळ झाडे: ऑलिव्ह, अंजीर,
द्राक्षे, अक्रोड,
मोसंबी, अक्रोड
·
झुडपे: बे लॉरेल, एरिक्स,
चामिस, सागेस,
सेगब्रश
·
गवत: रशेज़, सेजेस,
बंच ग्रास हे
गवताचे प्रकार
·
औषधी वनस्पती:
रोसमेरी,
थाइम, लैवेंडर
प्राणीजीवन: गवताचा आभाव असल्याने या प्रदेशात मोजक्या पाळीव प्राण्यांव्यतिरिक्त विपुल प्राणीजीवन आढळत नाही
व्यवसाय: शेती व शेतीवर आधारित उद्योग हे येथील प्रमुख आर्थिक व्यवसाय आहेत. गहु, जव, मक ही येथील प्रमुख पिके आहेत. भूमध्यसागरी हवामान फळ लागवडीसाठी पोषक असल्याने द्राक्षे, अंजीर, ऑलिव्ह, अक्रोड, डाळिंब या फळांची रेलचेल आहे. पर्यायाने ऑलिव्ह तेल काढणे, द्राक्षंपासून मद्य तयार करणे, फळे सुकवून निर्यात करणे हे देखील प्रमुख व्यवसायच आहेत. ऑलिव्ह तेलाचा उपयोग स्वयंपाकात केला जातो. दक्षिण यूरोपमध्ये द्राक्ष लागवड तर पुर्तगाल, फ़्रांसमध्ये द्राक्षंपासून मद्य बनविण्याचे उद्योग चालतात. सुवासिक फुलांच्या लागवडीमुळे अत्तरनिर्मिती, ऑलिव्ह तेलापासून साबण तयार करणे तसेच रेशीम उद्योग देखील केले जातात
इतर वैशिष्ठये: स्वच्छ सूर्यप्रकाश व हवा यांमुळे उत्तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे चित्रपट व्यवसायाचे केंद्रीकरण झालेले असून लॉस ऐंजल्सजवळील हॉलीवुड हे त्याचे प्रमुख केंद्र आहे. प्राचीन रोमन व ग्रीक संस्कृतीचा विकास या हवामान प्रदेशात झाला असून आजही या संस्कृतीचे अवशेष तेथे आढळतात. भूमध्य सागरी प्रदेशास 'जगातील फळांचा प्रदेश' म्हणून ओळखले जाते.
खनिज संपत्ती: भूमध्य सागरी हवामानी प्रदेशातील खनिज संपत्ती खलीलप्रमाणे, कॅलिफोर्नियामध्ये खनिज तेल त्याचप्रमाणे चीलीमध्ये तांबे, नाइट्रेट. युगोस्लाव्हिया व फ्रांसमध्ये बॉक्साईट तर इटली व स्पेनमध्ये पारा हे खनिज आढळते
इतर महत्त्वाचे: या हवामान प्रदेशात लोह व
कोळसा यांचे साठे कमीप्रमाणात असल्यामुळे पायाभूत अवजड उद्योगांची वाढ ही मंद आहे.
पर्यटन व्यवसायामुळे मात्र या प्रदेशाची भरभराट झालेली आहे