मध्य प्रदेश - Scholarship Exam

 

मध्य प्रदेश हे भारत देशामधील क्षेत्रफळापनुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे व २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत ६ व्या क्रमांकावर आहे. ह्याला भारताचे ह्रदय देखील म्हटले जाते. मध्य प्रदेशात वाघांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. म्हणून या राज्याला टायगर स्टेट या नावाने सुद्धा ओळखले जाते. फार फार पूर्वी अवंती महाजनपद म्हणून हा प्रदेश ओळखला जात होता. त्याकाळी त्या प्रदेशाची राजधानी उज्जैन होती. मध्य प्रदेश या राज्याच्या मध्यावर नर्मदा नदी आहे व सातपुडा  विंध्य हे पर्वत आहेत. मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळ आहे. मध्य प्रदेश राज्याचे दहा प्रशासकीय विभाग आहेत

इतिहास

भारतातील मध्य प्रदेश हे राज्य, भाषावार प्रांतरचनेनंतर १ नोव्हेंबर इ.स. १९५६ ला बनवले गेले. त्यानंतर, १ नोव्हेंबर इ.स. २०००ला पुन्हा त्याच्यातून छत्तीसगढ हा विभाग वेगळा होऊन त्याचे स्वतंत्र राज्य निर्माण केले गेले. नर्मदा नदी च्या खोर्यामध्ये हठ्नोरा आदिमानव मध्य प्रदेशात 300,000 सुमारे वर्षांपूर्वी, मिडल Pleistocene कालखंड पासून जगात आले असते हे दर्शविते.

भूगोल

मध्य प्रदेशला लागून

·       ईशान्येला - उत्तरप्रदेश,

·       पश्चिमेला - गुजरात,

·       पूर्वेला- छत्तीसगढ,

·       वायव्येला- राजस्थान 

·       दक्षिणेला महाराष्ट्र आहेत.