तेलंगणा - Scholarship Exam

 

तेलंगणा (लेखनभेद: तेलंगण  किंवा तेलंगाणा) भारताचे २९वे राज्य आहे. जून २, इ.स. २०१४ रोजी स्थापन झालेले हे राज्य पूर्वी आंध्र प्रदेशचा भाग होते. या प्रदेशावी प्राचीन नावे तेलिंगाण, तेलिंगा, त्रिलिंग अशी होती.

तेलंगणा भौगोलिक दृष्टया मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांच्या सीमांलगत आहे. तांदूळ हे मुख्य पीक असलेला हा प्रदेशगोदावरी खोऱ्यात असून हा भाग ऐतिहासिक काळात सातवाहन (इ.स.पू. २२१ - इ.स. २१८), गोवळकोंड्याची कुतुबशाही (इ.स. १५२० - इ.स. १६८७) आणि हैदराबादचा निजाम (इ.स. १७२४ - इ.स. १९४८) यांच्या सत्तेखाली राहिला. इ.स.च्या विसाव्या व एकविसाव्या शतकातसाम्यवाद आणि नक्षल विचारप्रणालींचा लक्षणीय प्रभाव या प्रदेशावर आढळतो. हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर इ.स. १९४८ साली हा भाग स्वतंत्र भारतीय संघराज्यात विलीन झाला. हैदराबाद ही तेलंगणा ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे तर तेलगू ही प्रमुख भाषा आहे.

इतिहास

तेलंगणा हे वेगळे राज्य घोषित करण्यात यावे, यासाठी अनेक वर्षे तेलंगण राष्ट्रीय समितीने लढा चालवला होता. डिसेंबर ९, २००९ रोजी या प्रयत्नांना यश येऊन भारत सरकारने तेलंगणा हे वेगळे राज्य होणार असल्याचे जाहीर केले. तेलंगण राज्याच्या स्थापनेसाठीचे विधेयक १५ व्या लोकसभेत १८ फेब्रुवारी २०१४ ला आणि राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात २० फेब्रुवारी २०१४ ला संमत करण्यात आले आणिराष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले.

तेलंगणा राज्यात पुढील जिल्ह्यांचा समावेश होतो: आदिलाबाद जिल्हा, करीमनगर जिल्हा, खम्मम जिल्हा, नालगोंडा जिल्हा,निजामाबाद जिल्हा, मेडक जिल्हा, वारंगळ जिल्हा, रंगारेड्‍डी जिल्हा, महबूबनगर जिल्हा  हैदराबाद जिल्हा.

वाहतूक

हैदराबाद शहर हे तेलंगणामधील सर्वात मोठे वाहतूक केंद्र आहे. हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतामधील एक प्रमुख विमानतळ असून येथून देशातील सर्व मोठ्या शहरांसाठी तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्थानांसाठी थेट प्रवासी सेवा उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय सिकंदराबाद रेल्वे स्थानक येथे असून हैदराबाद रेल्वे स्थानक, वारंगळ रेल्वे स्थानकइत्यादी मोठी स्थानके देशातील इतर भागांसोबत जोडली गेली आहेत. तेलंगणा एक्सपेस, सिकंदराबाद राजधानी एक्सप्रेस इत्यादी जलद गाड्या हैदराबादला [दिल्ली] सोबत जोडतात तर चारमिनार एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, गोळकोंडा एक्सप्रेस इत्यादी येथील प्रसिद्ध गाड्या आहेत.