मुधोळ मधील बेरड जमातींचा उठाव, औरंगाबादेतील उठाव - Scholarship Exam

  मुधोळ मधील बेरड जमातींचा उठाव

इंग्रजांनी १८५७ मध्ये शस्त्रबंदीचा कायदा केला. मुधोळमधील हुलगडीच्या बेरडांना हा कायदा मान्य नव्हता. तरीही मुधोळ संस्थानच्या कारभाऱ्यांनी बेरड जमातीच्या प्रमुखास कायद्याचे महत्व समजावून सांगितले. त्यांच्याकडील शस्त्रास्त्रांची नोंद करून घेतली. परंतु बेरड समाजाने आपल्या प्रमुखास गद्दार घोषित करून त्याला वाळीत टाकले. ५०० बेरड एकत्र आले. त्यांनी गावोगाव जाऊन प्रचार केला कि कोणीही सरकारकडे शस्त्रे जमा करू नये. मुधोळच्या कारभाऱ्याने तेथील पॉलिटिकल एजंटला बातमी कळविली व विजापूर येथील सैन्य बोलाविले. इंग्रज सैन्य व बेरडांत चकमक सुरु झाली. परिस्थिती आटोक्यात आल्याचे सांगून इंग्रज सैन्य निघून गेले. पण नंतर रात्री २ वाजता इंग्रज सैन्य परतले व हुगळी गावात शिरले. तेथे त्यांनी सुमारे २०० बेसावध बेरडांची कत्तल केली.

औरंगाबादेतील उठाव

औरंगाबादेतील घोडदळाच्या पलटणीत बहुसंख्य मुस्लिम सैनिक होते. मुघल बादशाहविरुद्ध उत्तरेकडे लढाईसाठी जाण्यास ब्रिटिश घोडदळातील मुस्लिम सैनिक नाखुश होते. त्यामुळे त्यांनी फिदाअलीच्या नेतृत्वाखाली उठाव केला.