विषुवृत्त, अक्षवृत्त व रेखावृत्त - Scholarship Exam

 

विषुवृत्त, अक्षवृत्त रेखावृत्त

विषुववृत्तामुळे पृथ्वी चे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग होतात. उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध तर दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. विषुववृत्ता च्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्ते आकाराने लहान-लहान होत जातात. पृथ्वी गोलावर उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांना ती बिंदु स्वरूप असतात. त्यांना अनुक्रमे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव असे म्हणतात. अक्षवृत्ताची मूल्ये सांगताना ती अक्षवृत्ते उत्तर गोलार्धात आहेत की दक्षिण गोलार्धात आहेत हे सांगणे आवश्यक असते.  सर्वात मोठ्या अक्षवृत्ताला विषुवृत्त म्हणतात. तर सर्वात लहान बिंदू स्वरूप अक्षवृत्ताला ध्रुव म्हणतात. विषुवृत्तामुळे पृथ्वीचे दक्षिण गोलार्ध उत्तर गोलार्ध असे दोन भाग पडतात. अक्षवृत्ताचे विषुवृत्तापासूनचे अंतर अंशामध्ये सांगितले जाते. त्यास अक्षांश म्हणतात.  पृथ्वीवर १८१ अक्षवृत्ते मानली जातात. सर्व रेखावृत्तांची लांबी सारखीच असते. दोन रेखावृत्तामधील अंतर विषुवृत्तावर जास्तीत जास्त असते.  यु.के. मधील ग्रीनिच शहरातून जाणारे रेखावृत्त शून्य रेखावृत्त मानले जाते. त्यास मूळ रेखावृत्त असेही म्हणतात.  पृथ्वीच्या पृष्ठभागावर ३६० रेखावृत्त मानली जातात. रेखावृत्तातील अंतर मूळ रेखावृत्तापासून अंशात सांगतात. त्यास रेखांश असे म्हणतात. अक्षवृत्त रेखावृत्त यांच्या जाळीस वृत्तजाळी असे म्हणतात. दोन अक्षवृत्तामधील अंतर १११ किमी असते. अक्षवृत्ताचा पयोग हवामानासाठी होतो. विषुवृत्त तसेच दोन समोरासमोरील रेखावृत्ते मिळून तयार होणाऱ्या वर्तुळास बृहद्वृत्त म्हणतात. बृहद्वृत्ताची लांबी पृथ्वीच्या परिघाइतकी असते. प्रकाशवृत्त हेसुद्धा बृहद्वृत्त आहे. प्रत्येक एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक ेळेत ४ मिनटांचा फरक असतो. आपल्याकडे अरुणाचल प्रदेश व गुजरात यांच्यात साधारणतः १ तास ५६ मिनटाचा फरक पडतो. भारताची प्रमाणवेळ हि ८२°३०' पूर्व या रेखावृत्तावरून ठरवली आहे. हे रेखावृत्त अलाहाबाद वरून जाते. भारताची प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा तास ३० मिनटानी पुढे आहे.  जागतिक संकेतानुसार पृथ्वीवर तारीख वार १८०° रेखावृत्तावर बदलले जातात.  आंतरराष्ट्रीय वाररेषा वॉन वायहेक या शास्त्रज्ञाने शोधून काढली. रेखावृत्ताची आवश्यकता जागतिक प्रमाणवेळेसाठी असते. दोन रेखावृत्तामधील अंतर १११.३२ किमी असते.

कर्कवृत्त 

कर्कवृत्त (The Tropic of Cancer or, Northern Tropic) हे पृथ्वीवरील पाच प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो.

कर्कवृत्त विषुववृत्तापासून २३° २६′ २२″ अंश(सुमारे साडेतेवीस अंश) उत्तरेस आहे. विषुववृत्तापासून कर्कवृत्तासारख्याच अंतरावर असलेल्या दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्तास मकरवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास उष्ण कटिबंध असे म्हणतात.

मकरवृत्त

मकरवृत्त (The Tropic of Capricorn or, Southern Tropic) हे पृथ्वीवरील पाच प्रमूख अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे मकरवृत्त हे सर्वात दक्षिणेकडील अक्षवृत्त होय.

मकरवृत्त विषुववृत्तापासून २३° २६′ २२″ (सुमारे साडेतेवीस) अंश दक्षिणेस आहे. मकरवृत्तासारखेच उत्तर गोलार्धातील अक्षवृत्तास कर्कवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास उष्ण कटिबंध असे म्हणतात.