भारत हा एक
प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेला देश आहे. उत्तर भारतातील आर्यांच्या वास्तव्यामुळे यास आर्यावर्त म्हटले जाते. भरत राजाच्या आर्यांच्या शाखेमुळे भारतवर्ष
नाव पडले तर
वायव्येकडे वाहणा-या नदीस
सिंधू नाव पडले. इरानी लोकानी सिंधू नदीचा उल्लेख हिंदू व भारताचा
हिंदुस्थान असा केला- ग्रीक लोकांनी सिंधू नदीचा उल्लेख इन्डोस असा केला तर
रुमानियन लोकांनी सिंधूस इंडस व भारतात इंडिया असे नाव दिले.
भारताचे स्थान
:-
भारत उत्तर
- पूर्व गोलार्धात येतो.त्याचे
स्थान दक्षिण आशियाच्या मध्यात येत असतो . `भारताच्या
प्रचंड आकारामुळे त्यास उपखंड म्हणतात. भारतीय उपखंडात भारत, मालदिव, पाकिस्थान भुतान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका
यांचा समावेश होतो. भारताची मुख्य भुमी आशिया खंडाच्या दक्षिणेस अक्षवृतीय
विस्तार ८०४ उ. ते ३७०६ उ. अक्षांश(८’४’२८” ते ३७’६’५३”) तर रेखावृतीय विस्तार ६८०७ पू. ते ९७०२५ पू.(६८’७’३३” ते ९७’२४’४७”) रेखावृत्तापर्यंत पसरलेली आहे. भारताचे अति दक्षिणेचे टोक म्हणजे इंदिरा पॉइंट ( ग्रेट निकोबार ) ६०३० उत्तर अक्ष वृत्तावर आहे. कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते. ( गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, प.
बंगाल, त्रिपूरा, व मिझोराम
) भारताचे दक्षिण टोक विषुववृत्तापासुन ८७५ कि.मी.
अंतरावर आहे. भारताची पूर्व – पश्चिम लांबी २९३३ कि.मी. असून उत्तर दक्षिण लांबी ३२१४ कि.मी. इतकी आहे.
भारताच्या सीमा
व
क्षेत्रफळ
:-
भारताचे क्षेत्रफळ
३२,८७,२६३
चौ.कि.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. भारताने जगाचे २.४२ % क्षेत्रफळ व्यापले आहे. (जगातील सर्वात मोठे देश
आकारानुसार १) रशिया
२) कँनडा ३) चीन
४) अमेरिका ५) ब्राझील
६) ऑस्ट्रेलिया व ७)
भारत)
भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी ६१०० कि.मी.
आहे, तर
एकूण समुद्री किनारपट्टीची लांबी ७५१६ कि.मी.
आहे. भारताची जल सीमा
किना–यापासुन १२ नॉटिकल
मैल लांबी आहे. भारतात सर्वाधिक किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली
आहे. भारतास एकूण १५,२००
कि.मी. लांबीची
भू-सीमा लाभली आहे. भारताच्या दक्षिण बाजूस हिंदी महासागर आहे. पश्चिम बाजूस अरबी समुद्र तर पूर्वेस
बंगालचा उपसागर आहे. समुद्रमार्गे श्रीलंका हा देश
भारतास सर्वात जवळ आहे. मन्नारचे आखात व पाल्कच्या
सामुद्रधुनीमुळ श्रीलंका भारतापासून वेगळ झाल आहे.भारताच्या
वायव्येस: पाकीस्थान आणि
अफगाणिस्थान , उत्तरेस : चीन , नेपाल , भूतान , दक्षिणेस : श्रीलंका , आग्नेयेश : इंडोनेशिया,
नैऋतेस: मालदीव , पूर्वेस : म्यानमार (ब्रम्हदेश ) आणि बांगलादेश ही
राष्ट्रे आहेत .भारतात सध्या २९ घटकराज्य आणि ७ केंद्राशाशित प्रदेश आहेत .( २ जून
२०१४ रोजी आंध्रप्रदेश राज्याच्या विभाजनातून तेलंगाना हे भारतातील २९ वे राज्य
निर्माण झाले .)
भारताची प्रमाण-वेळ
भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक
समन्वित वेळेपेक्षा ५
तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ अलाहाबाद वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे
ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९४१-४५च्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी
असा बदल करण्यात आला होता.
ही
वेळ ८२.५° पूर्व
या रेखांशावर असलेली स्थानिक वेळ आहे. अलाहाबाद शहराजवळील मिर्झापूर गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे.
मिर्झापूर आणि इंग्लंडमधील रॉयल
ऑब्जरव्हेटरी (ग्रीनविच) यांच्या वेळांत रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे.
स्थानिक वेळ अलाहाबाद वेधशाळेतील घडाळ्यानुसार मोजली जाते. पण राष्ट्रीय
भौतिक प्रयोगशाळा दिल्ली येथे
आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते.१५ एप्रिल २००६पासून श्रीलंकेने भारतीय प्रमाणवेळ वापरणे सुरू केले.