अरुणाचल प्रदेश - Scholarship Exam


अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्यया राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे. या राज्याच्या सीमा चीन वम्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी इ.स. १९६२ साली युद्ध केले होते.

इटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अरुणाचलमध्ये शेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही.

इतिहास

आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य इ.स. १९८७ साली स्थापन झाले.

भूगोल

अरुणाचलच्या दक्षिणेला आसाम हे राज्य आहे तर पश्चिमेला भूतान, उत्तरेला चीन तर पूर्वेला म्यानमार हे देश आहेत. अरूणाचलचे क्षेत्रफळ ८३,७४३ चौ.किमी एवढे आहे. तर लोकसंख्या १३,८२,६११ एवढी आहे. भारतात सर्वात विरळ लोकसंख्या अरूणाचल प्रदेशाचीच आहे. तरीही या छोट्याशा राज्याचे भारतासाठी भूराजकीय महत्त्व आहे. मोनपा  मिजी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. अरूणाचलची साक्षरता ६६.९५ टक्के आहे. या राज्यातआदिवासींचे प्रमाण जास्त असल्याने भारतातल्या कमी साक्षर राज्यात या राज्याची गणना होते. भात, मका  नाचणी ही अरूणाचलमधील प्रमुख पिके आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशाचा काही भाग बळकावल्याचे आरोप असून, हा वाद अधूनमधून उफाळत असतो.

अरुणाचल हे अतुलनीय निसर्ग सौंदर्याने नटले असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे राज्य आहे.

जिल्हे

अरुणाचल प्रदेश या राज्यात १३ जिल्हे आहेत.

राजवट

२६ जानेवारी २०१६ रोजी भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने अरुणाचल प्रदेशावर राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. मात्र राष्ट्रपती राजवट मागे घेऊन तेथे पुन्हा काँग्रेसचे सरकार प्रस्थापित करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून त्यात ९ डिसेंबर २०१५ रोजी राज्यपालांनी काढलेले सर्व आदेश व निर्णय रद्दबातल केले.