विश्व - Scholarship Exam

 

"काल-अवकाशातील सर्व कण, ऊर्जा आणि पदार्थ यांची गोळाबेरीज" अशी विश्वाची व्याख्या करता येते. आपण पाहू शकत असलेले (दृश्य) विश्व हे संपूर्ण विश्वाचा एक अत्यंत छोटा भाग आहे असे अनेक खगोलशास्त्रज्ञ मानतात.

विश्वाचा पसारा अनंत असून त्याची उत्पत्ती एका महास्फ़ोटातून (Big bang) झाली असे मानले जाते. विश्व हे सतत प्रसरण पावत आहे. (Expanding universe). नव्वदच्या दशकातील निरीक्षणांवरून असे दिसून आले आहे की विश्वप्रसरणाचासुद्धा वेग वाढता आहे.

तारे

अवकाशामध्ये गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र असणाऱ्या आणि प्लाझ्माचा बनलेल्या चमकत्या गोलाला तारा असे म्हटले जाते. सूर्य हा पृथ्वीला सर्वांत जवळचा तारा आहे. रात्रीच्या वेळी बहुदा तारे निळसर पांढऱ्या रंगाचे दिसतात. काही ताऱ्यांचा रंग लालसर तांबूस, हिरवट किंवा पिवळसर दिसतो. तारा वातावरणाच्या जास्त थरातून येताना होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणामुळे अनेक रंगांमध्ये चमकताना दिसतो. ताऱ्याचे हे रंग फसवे असतात, पण तारा जर आकाशात, क्षितिजापासून उंच असेल व हवा स्थिर असेल तर ताऱ्याचा दिसणारा रंग खरा असू शकतो. तारे वायुरूप व तप्त असतात. ताऱ्यांच्या अंतर्भागातील तापमान काही कोटी अंश सेल्सिअस असले तरी त्यांच्या पृष्ठभागावरील तापमान काही हजार अंश सेल्सिअस इतके असते. या तापमानानुसारच ताऱ्यांना रंग प्राप्त होतो.

मृग तारकासमूहातील काक्षी हा तारा लाल रंगाचा दिसतो. स्वाती नक्षत्राचा तारा नारंगी रंगाचा आहे. व्याध हा निळसर रंगाचा तारा आहे.

तार्‍यांची निर्मिती

तार्‍यांचा जन्म अवकाशातल्या धुलीकण आणि वायु ( खासकरुन हायड्रोजन) यांच्या अतिप्रचंड आकाराच्या मेघातून होतो. त्या मेघांना नेब्यूला अथवा तेजोमेघ म्हणून ओळखले जाते. या नेब्यूल्यांची घनता फार कमी साधारण १-१० अणु प्रतिघन सें.मी. इतकी असते. (आपण श्वास घेत असलेल्या हवेची घनता १०१९ अणु प्रतिघन सें.मी. इतकी आहे). यानंतर विश्वातले मूलभूत असणारा गुरुत्वीय बल आपले कार्य करते. मेघातील अणूपरस्परांना आकर्षित करून जवळ येऊ लागतात. यामुळे मेघाचे वस्तुमान वाढू लागते. अखेर एका ठरावीक मर्यादेनंतर तो मेघ आपल्या वाढलेल्या वस्तुमानामुळे स्वतःच्या गाभ्याकडे ढासळण्यास सुरवात होते. यामुळे केंद्रभागाची घनता वाढून गाभ्याची निर्मिती होते. गाभ्याकडे ढासळणार्‍या अणूंच्या टकरींमधून आणि ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार गुरुत्वीय बलाचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत होते. गाभ्याचे तापमान वाढण्यास सुरवात होते. आणि आदितार्‍याचा जन्म होतो. ‘'आदितारा’' ही ताऱ्याची प्राथमिक अवस्था होय. आदितार्‍यांचे तापमान मेघापेक्षा वाढलेले असले तरी प्रकाश उत्सर्जित करण्यासाठी ते कमीच असते. पण कुठल्याही उष्णताधारक वस्तूतून ज्याप्रकारे अवरक्त किरण निघतात , त्याचप्रकारे आदितार्‍यांमधून अवरक्त किरण बाहेर पडतात. त्यामुळे अवरक्त किरणांच्या शोधावरून आदितारे पाहता येतात. काही वेळा मेघातुन एका ऐवजी दोन तारे ही निर्माण होतात. हे तारे ठरावीक अंतरावरुन एकमेकांभोवती फेर्‍या मारत राहतात. यांना जुळे तारेही म्हटले जाते.

ताऱ्याचा उदय आणि ताऱ्यातील उर्जानिर्मिती

आदिताऱ्याच्या गाभ्याचे तापमान वाढत जाऊन १० दशलक्ष केल्विन इतके होते त्यावेळी अणुकेंद्र संमीलनाच्या (Nuclear Fusion) क्रियेद्वारे हायड्रोजनचे ज्वलन सुरू होते. या क्रियेत हायड्रोजनचे चार अणु एकत्र येऊन त्यांच्यापासून ‘हेलियम’चा एक अणु तयार होतो. मात्र हायड्रोजनच्या चार अणूंचे वस्तुमान व एका हेलियम अणूचे वस्तुमान यात किंचित (०.७० टक्के) फरक आहे. यामु़ळे आइन्स्टाइनच्या E=mc ( E = निर्माण होणारी उर्जा, m= वस्तुमानातील फरक, घटलेले वस्तुमान, c= प्रकाशाचा वेग जो ३,००,००० किमी प्रति सेकंद इतका प्रचंड आहे) या सूत्रानुसार त्याचे उरलेल्या वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होते. ही ऊर्जा प्रकाश  उष्णता यांच्या स्वरूपात अवकाशात फेकली जाते. यालाच ताऱ्याचा जन्म झाला असे म्हणतात. अशाच प्रकारे आपल्याला सुर्यापासुन उर्जा मिळते व पृथ्वीवर अन्नस्त्रोत निर्माण करायला कारणीभूत ठरते. जसा प्रकाश बाहेर पडू लागतो, तसा आदितारा दृश्यमान होऊ लागतो. यालाच ताऱ्याचा जन्म झाला असे म्हणतात. वास्तविक तार्‍याची निर्मिती प्रक्रिया पूर्वीच तेजोमेघात सुरू झालेली असते. मात्र अणुकेंद्र संमीलनातून प्रकाशाच्या उत्सर्जनाने तारा प्रथमच दिसू लागतो. अणुकेंद्र संमीलनाची ही प्रक्रिया शृंखलाबद्ध असते. यातुन सतत हायड्रोजनचे ज्वलन होऊन त्यातून ऊर्जा आणि शृंखलेतील पुढचे हेलियम तयार होत रहाते.

स्थिर अवस्था 

तार्‍यात अणुंची गाभ्याकडे ढासळण्याची क्रिया ही अखेर थांबते. याला कारणीभुत ठरते ती अणुकेंद्र संमीलनातून निर्माण होणाऱ्या उष्मीय दाबा व उर्जा. गुरुत्वाकर्षण ताऱ्याला आतल्या बाजूने खेचत असते, तर दाब बाहेरच्या बाजूने ढकलत असतो. ही दोन्ही बले परस्परांना संतुलित करतात , यामुळे गाभ्याचे तापमान प्रचंड ही राहते अणुकेंद्र संमीलनाची प्रक्रिया चालु ठेवण्यास मदत करते व तारा स्थिरावतो. या स्थितीला हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रीयम असे म्हणतात. तारा हायड्रोजनचे ज्वलन चालु असे पर्यंत बहुतांश काळ याच स्थितीत व्यतीत करतो. हा त्याचा ‘मेन सिक्वेन्स’ काळ होय. आपला सूर्य साधारण ५ अब्ज वर्षापसुन याच स्थितीत आहे व अजून ५ अब्ज वर्ष तो याच स्थितीत असेल, मात्र अखेर त्याचे इंधन म्हणजेच हायड्रोजन संपुन इतर तारयांप्रमाणे सुरू होईल त्याचा अंतकाळ.

ताऱ्यांचा अंत

अणुकेंद्र संम्मीलनात हायड्रोजनचे रुपांतर होत असल्याने तो कमी होत जातो तर हेलियम वाढत जातो. यात ताऱ्याला बाहेरच्या बाजूने ढकलणारा उष्मीय दाब गुरुत्वाकर्षणाच्या तुलनेत कमी होत आणि गाभा आकुंचन पावू लागतो. या आकुंचनामुळे गाभ्याची घनता वाढते. परिणामी तापमान आणि ज्वलन प्रक्रियेचा वेगही वाढू लागतो. याचा परिणाम तारा अधिकाधिक तेजस्वी दिसू लागण्यात होतो. यालाच तारा सुजणे किंवा फुगणे असे म्हणतात. जेव्हा ताऱ्याच्या अंतर्भागातील हायड्रोजन पूर्णपणे संपुष्टात येतो व ऊर्जानिर्मिती थांबते तेव्हा गुरुत्वीय बल इतके प्रभावी बनते की, गाभ्यात फक्त हेलियम उरलेला असतो त्याचेही ज्वलन सुरु होते. ही क्रिया साधारण गाभ्याचे तापमान जेव्हा सुमारे १० कोटी केल्विन पर्यंत पोहोचते तेव्हा होते आणि ताऱ्याला ऊर्जा निर्मितीचा दुसरा स्रोत मिळतो. या क्रियेस ट्रिपल अल्फा प्रोसेस असे म्हणतात. यात कार्बन तयार होतो व गाभ्याचे आकुंचन चालूच राहते. काही वर्षांनी तापमान इतके उच्च होते की, हेलियमच्या गाभ्याचा प्रचंड स्फोट होतो. यालाच सुपर नोव्हा असे म्हणतात. हा स्फोट अतिशय प्रचंड असून तरी तीव्र उर्जेचे गॅमा किरण त्यातुन बाहेर पडतात. पृथ्वीपासून काही प्रकाशवर्षे अंतरावर जरी असा स्फोट झाला तरी पृथ्वी वरील जीवन पुर्णपणे नष्ट होईल. या स्फोटात तार्‍याचे वस्तुमान जरी विखुरले जात असले तरी असा प्रचंड स्फोटही ताऱ्याला पूर्णपणे संपवू शकत नाही. अखेर ' चंद्रशेखर मर्यादा ' नुसार हे ठरते की तारा श्वेतबटू, न्यूट्रॉन तारा व कृष्णविवर यापैकी काय बनेल.

ग्रहीय तेजोमेघ

विश्व जन्मास आले त्यावेळी अवकाशात हेलियम  हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये विपुल प्रमाणात तयार झाली असे मानले जाते. इतर जड मूलद्रव्ये (उदा. प्राणवायूनत्र, इ.) तार्‍यांमुळे निर्माण झाली. तारे हे अशी मूलद्रव्ये बनविण्याची भट्टी आहे. ताऱ्यांना त्यांचीऊर्जा हायड्रोजन अणूंच्या केंद्रकांच्या संयोगातून हेलियम निर्माण करून मिळते असे मानले जाते. असा तारा कोट्यावधी वर्षे अशा रीतीने ऊर्जा मिळवतो. या प्रक्रियेअंती ताऱ्याच्या गाभ्यातील हायड्रोजन संपून जातो. अशा वेळी तारा आकुंचन पावतो आणि यामुळे वाढलेल्या तापमानात हेलियमचे रूपांतर कार्बनमध्ये होण्यास सुरुवात होते. पुढे अशाच प्रक्रियांमधून इतर मूलद्रव्येही निर्माण होतात असे मानले जाते. ही मूलद्रव्ये बाहेर अवकाशात विखुरली जातात. ताऱ्याच्या वार्धक्याच्या काळात एक वेळ अशी येते की, ताऱ्याचे बाहेरील कवच ताऱ्यातील अस्थिर स्थितीमुळे दोलायमान होते. याचे पर्यवसान अंतिमत: ताऱ्याचे बाहेरचे कवच अवकाशात उधळण्यात होते. या प्रक्रियेतच ताऱ्यात निर्माण झालेली मूलद्रव्ये अवकाशातच विलीन होतात. तारा व त्यातून भिरकावलेल्या वायू व मूलद्रव्यांचा ताऱ्याभोवती एक प्रकाशमान ढग तयार होतो. ज्यास ग्रहीय तेजोमेघ (planetary nebulae) म्हणतात. या घटनेनंतर तारा मृत्युपंथाला लागतो. पण ताऱ्यातून अवकाशात विखुरलेली ही मूलद्रव्ये पृथ्वीसारखे ग्रह व त्यावरील मानवासारखे जीव बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जुलै २०१० मध्ये स्पिट्झर या या अवकाशस्थित दुर्बिणीला बकीबॉल या बकीबॉल हा आजवर अवकाशात सापडलेला सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण आणि विशाल रेणूंचा साठा टीसी-१ या ग्रहीय तेजोमेघात आढळला होता.

दीर्घिका

दीर्घिकांना आकाशगंगा असेही म्हटले जाते. गुरुत्वाकर्षणामुळे तारे, धूलिकण, कृष्ण पदार्थ तसेच जुन्या ताऱ्यांचे अवशेष अवकाशात एकत्र येतात. त्यालाच आपण आकाशगंगा असे म्हणतो. या सर्व पदार्थांना धरून ठेवण्यासाठी आकाशगंगेच्या केंद्रस्थानी बहुधा एक कृष्णविवर असते.

मंदाकिनी

हे आपल्या आकाशगंगेचे नाव आहे. आपली आकाशगंगा स्पायरल प्रकारची आहे. देवयानी ही आपल्या सर्वात जवळची दीर्घिका आहे. या आकाशगंगेत अंदाजे १०० अब्ज तारे आहेत.

आकाशगंगा

आपली आकाशगंगा ही, सूर्यमाला आणि पर्यायाने पृथ्वी ज्या तारकासंघात आहे, त्या तारकासंघाचे (दीर्घिकेचे) नाव आहे. तिचे इंग्रजी नाव गॅलॅक्सी किंवा मिल्की वे अर्थात दुधट(दुधी रंगाचा) मार्ग असे आहे. अगदी दाट अंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह आपल्याला दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा. हंस, वृषपर्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसू, मृग नक्षत्र, नौका, वृश्चिक रास, धनु रास गरुड या ताऱ्यांमधून आपली आकाशगंगा पसरलेली आहे.

सूर्यमाला ही आकाशगंगेच्या मध्यापासून बाहेरील बाजूस सुमारे दोन तृतीयांश अंतरावर आहे, तर सूर्य साधारण ३५००० प्रकाशवर्षे दूर आहे. सूर्याजवळ आकाशगंगेची जाडी २५०० प्रकाशवर्षे आहे.

सूर्य, या आकाशगंगेच्या केंद्राभोवती परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वीची २२.५ ते २५ कोटी वर्षे एवढा काळ घेतो. इंग्रजीत हा काळ गॅलेटिक इयर म्हणून ओळखला जातो.

आकाशगंगा ही अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. विश्वाच्या तुलनेत आकाशगंगेचा आकार जरी लहान असला तरी तिच्यात अब्जावधी(सुमारे ४० अब्ज) तारे आहेत. आकाशगंगेचे विशाल स्वरूप, तिचा वैशिष्ट्यपूर्ण आकार, व त्यामधील आश्चर्यकारक तेजोमेघ या सर्व गोष्टी विलक्षण आहेत. आकाशगंगेचा व्यास एक लाख प्रकाशवर्षे आहे.

विश्वामध्ये एकाहून अधिक आकाशगंगा असाव्यात. संस्कृतमध्ये आकाशगंगेला दुसरे नाव मंदाकिनी असे आहे.

आकाशगंगेचा जन्म

एके काळी ज्युपिटर देवाच्या पट्टराणीचा, जुनोचा मुलगा हर्क्युलस हा अतिशय अवखळ आणि खोडकर होता. एके दिवशी जुनो हर्क्युलसला स्तनपान करीत असतानाही त्याचा अवखळपणा चालू होता. त्यावेळी जुनोच्या स्तनामधून दुधाचा प्रवाह जो उसळला तो थेट स्वर्गामधून वाहू लागला. अजूनही तो दुधी रंगाचा पट्टा आपल्याला आकाशात दिसतो. ग्रीक लोकांनी त्या पट्ट्याला "दुग्ध मार्ग", "मिल्की वे" असे नाव ठेवले.

तारकासमूह

आधुनिक खगोलशास्त्रामध्ये तारकासमूह (Constellation: कॉन्स्टेलेशन) हे इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने (आय.ए.यू.ने) ठरवलेले खगोलावरील विशिष्ट क्षेत्र आहे.त्यानुसार संपूर्ण आकाश व्यापतात असे अधिकृत मान्यता असलेले एकूण ८८ तारकासमूह आहेत. 

खगोलीय निर्देशक पद्धतीमध्ये प्रत्येक बिंदूला निःसंदिग्धपणे एक तारकासमूह नेमला जाऊ शकतो. खगोलशास्त्रामध्ये एखादी गोष्ट आकाशामध्ये अंदाजे कुठल्या भागात आहे हे दर्शवण्यासाठी त्या गोष्टीच्या निर्देशकांसोबत ती कोणत्या तारकासमूहात आहे हेही सांगितले जाते. इ.स. १९२२ मध्ये हेन्‍री रसेल याने खगोलाला ८८ अधिकृत भागात विभागण्यात आय.ए.यू. ला मदत केली. या प्रणालीचा हेतू खगोलाला सलग क्षेत्रात विभागणे हा होता.शक्य तेवढ्या तारकासमूहांची नावे ग्रीक-रोमन नावांवरून घेण्यात आली. महाराष्ट्रात प्रचलित असलेली तारकासमूहांची काही मराठी नावे बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी नावांवरून रूपांतरित केली असली तरी बरीच नावे पुरातनकालापासून अस्तिवात असलेली संस्कृत नावे आहेत. ८८ तारकासमूहांपैकी १२ तारकासमूह सर्वांनाच परिचित असतात. सूर्याच्या आकाशातील भासमान भ्रमणमार्गावर, आयनिक वृत्तावर असलेले बारा तारकासमूह भारतात ‘राशीया नावाने ओळखले जातात.या राशींव्यतिरिक्त उत्तर व दक्षिण आकाशात अनेक तारकासमूह आहेत. ८८ पैकी ३६ तारकासमूह मुख्यत: उत्तर गोलार्धात आहेत आणि ५२ तारकासमूह दक्षिण गोलार्धात आहेत.

ग्रह

अवकाशात तार्‍यांभोवती फिरणारा अस्वयंप्रकाशित गोळा म्हणजे ग्रह होय. पुरेशा वस्तुमानामुळे आलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याचा आकार गोल असतो.काही ग्रह खडकाळ (पृथ्वी, मंगळ इ.) तर काही वायुमय (गुरु, शनी इ.) असतात.ग्रहाभोवती फिरणाऱ्या इतर गोलाना उपग्रह म्हणतात .चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे .

लघुग्रह

लघुग्रह म्हणजे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे सूर्यमालेतील लहान आकाराचे व कमी वस्तुमानाचे ग्रह. मंगळ  गुरु या ग्रहांदरम्यानच्या रिकाम्या जागेत लघुग्रहांचा पट्टा आहे.

धूमकेतू

धूमकेतू किंवा शेंडेनक्षत्र म्हणजे उल्केसारखाच असणारा पण बर्फापासून बनलेला केरसुणीसारखा दिसणारा खगोलशास्त्रीय पदार्थ आहे. धूमकेतू अतिलंबगोलाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतात व फिरताफिरता ते प्लूटोच्याही पुढे जातात. धूमकेतूंमध्ये घन कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाणी आणि इतर बरेच क्षार असतात.

धुमकेतू अंतर्बाह्य अतिशय थंड व असुरक्षित असतो. त्याचे कवच सच्छिद्र असते व शीर्षस्थानी चॅाकलेटप्रमाणे थर असतात. धुमकेतूचा पृष्ठभाग स्फटिकासारखा आणि टणक असतो. मात्र, तो जेव्हा सूर्याच्याअतिनिकट येतो तेव्हा त्याचे हिमस्फटिकांत रूपांतर होते. त्यावेळी त्याची घनता अधिक असते. धुमकेतूचा पृष्ठभाग व अंतर्भाग मऊ असतो.

धूमकेतू सूर्यापासून अतिदूर अंतरावर असलेल्या ढगांपासून तयार होतात असे समजले जाते. असे ढग सौर अभ्रिकेपासून(Solar nebula) बनलेल्या घन कचर्‍यापासून तयार झालेले असतात. उल्का वेगळ्या पद्धतीने तयार होतात पण अतिथंड धूमकेतूच्या आतील अस्थिर वायू/बाष्प संपल्यावर त्याच्यापासून उल्का होतात.हॅलेचा धुमकेतू दर ७६ वर्षांनी दिसतो .(१९८६ मध्ये दिसला होता )

धूमकेतूचे आकारमान

धूमकेतूच्या शिराच्या मध्यभागी असलेल्या गाभ्याचा व्यास ५ ते १० कि.मी. असून त्याचे वस्तुमान १०१७ ते १०१८ ग्रॅम असते. पृथ्वीचे वस्तू १०२७ (एकावर २७ शून्य) आहे. म्हणजे धूमकेतूचे वस्तुमान प्रचंड असले तरी पृथ्वीच्या मानाने खूपच कमी आहे.

शीराचा गाभा इतका लहान असतो की जगातल्या सर्वात मोठ्या दुर्बिणीतूनही तो दिसू शकत नाही. असे असताना आपण धूमकेतू पाहतो म्हणजे काय पाहतो? आपण पाहतो तो प्रसारानं पावलेला कोमा होय. कधी कधी प्रसारानं पावलेला कोमा हा हजारो व्यासाच्या आकारमानाचा असतो. त्यातील धुलिकणांवर व इतर भागावर प्रकाश पडून तेथील प्रकाश किरण परावर्तित होतात व तो भाग चमकू लागतो, आपल्याला तेजस्वी दिसू लागतो. मंगळ, गुरू, शुक्र या ग्रहांप्रमाणे धूमकेतूसुद्धा सूर्यप्रकाशात चमकतात. धूमकेतू स्वयंप्रकाशी नाही.

धूमकेतूची शेपटी

धूमकेतूच्या शीराचा जो भाग (गाभा व कोमा) प्रसारानं पावतो व त्यातून वाळूयुक्त धुळीच्या कणांचे लोट बाहेर फेकले जातात. सूर्यापासून तर नेहमीच वायू व इतर द्रव्ये बाहेर फेकण्याची प्रक्रिया सतत चालूच असते. त्यामुळे एक प्रकारचा उर्त्सजन दाब निर्माण होत असतो. हा दाब लाटेप्रमाणे सर्व बाजूने पसरतो आणि धूमकेतूपासून हलके होऊन बाहेर पडणार्‍या वायू व धुलिकणांना बाजूला सतत ढकलत असतो. ढकलल्या गेलेल्या द्रव्यात लांबलचक शेपटीचा आकार तयार होतो. सूर्याचे प्रकाशकिरण पडून ती शेपटी चमकू लागते व आपल्याला तेजस्वी दिसते. शेपटीची लांबी काही कोटी मैलही असू शकते.

राशी

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

राशी

दर १४ जानेवारी रोजी भारतात 'मकर संक्रांत' साजरी होते कारण त्यावेळी सूर्य (ज्योतिष) मकर राशीमध्ये प्रवेश करीत असतो. या राशींची नावे, राशी स्वामी आणि क्रांतिवृत्तातील अंश खालीलप्रमाणे आहेत.

राशीचे
नाव

राशी
स्वामी

क्रांतिवृत्ताचे
अंश

राशीचे
नाव

राशी
स्वामी

क्रांतिवृत्ताचे
अंश

राशीचे
नाव

राशी
स्वामी

क्रांतिवृत्ताचे
अंश

मेष

मंगळ (ज्योतिष)

००१ ते ०३०

वृषभ

शुक्र (ज्योतिष)

०३१ ते ०६०

मिथुन

बुध (ज्योतिष)

०६१ ते ०९०

कर्क

चंद्र (ज्योतिष)

०९१ ते १२०

सिंह

सूर्य (ज्योतिष)

१२१ ते १५०

कन्या

बुध (ज्योतिष)

१५१ ते १८०

तूळ

शुक्र (ज्योतिष)

१८१ ते २१०

वृश्चिक

मंगळ (ज्योतिष)

२११ ते २४०

धनु

गुरू (ज्योतिष)

२४१ ते २७०

मकर

शनी (ज्योतिष)

२७१ ते ३००

कुंभ

शनी (ज्योतिष)

३०१ ते ३३०

मीन

गुरू (ज्योतिष)

३३१ ते ३६०

नक्षत्रे

क्रांतिवृत्ताचा १/२७ भाग म्हणजे एक नक्षत्र. एकूण नक्षत्रे २७ आहेत. एका राशीत सव्वा दोन नक्षत्रे असतात, प्रत्येक नक्षत्र १३ अंश २० कलांचे असते. (त्यात ४ चरण असतात). एक नक्षत्र अनेक तारकांनी बनलेले असते. व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असेल ती त्या व्यक्तीची चंद्ररास आणि जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उदित होणारी जी रास असेल ती त्या व्यक्तीची लग्नरास.

प्रत्येक राशीला विशिष्ट वर्ण, रंग, स्वामित्व, तत्त्व, इ. असते. राशींची तत्त्वे चार आहेत अशी कल्पना आहे. अग्नि (स्वभावाने कठोर, दाहक), पृथ्वी (स्वभावाने समंजस), वायू (स्वभावाने चंचल, गतिशील) आणि जल (स्वभावाने हळवा). मेष रास, सिंह रास आणि धनु रास या अग्नि तत्त्वाच्या, वृषभ रास, कन्या रास आणि मकर रास या पृथ्वी तत्त्वाच्या, मिथुन रास, तूळ रास आणि कुंभ रास या वायू तत्त्वाच्या तर कर्क, वृश्चिक आणि मीन या जल तत्त्वाच्या राशी आहेत.

 प्रकाश-वर्ष 

प्रकाश-वर्ष अथवा प्रकाशवर्ष हे अंतर मोजण्याचे एकक आहे. प्रकाशवर्षाची व्याख्या "निर्वात पोकळीमधे प्रकाशवेगाने एका वर्षात गाठलेले अथवा पुर्ण केलेले अंतर" अशी केली जाते. येथे एक वर्ष म्हणजे किती याची अधिकृत व्याख्या केली नसली तरी एक वर्षाचा अर्थ येथे एक "जुलियन वर्ष" असा घ्यावा असे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ सुचवते.

एका प्रकाशवर्षात ९४,६०,७३,०४,७२,५८०.८ एवढे किलोमीटर असतात.