महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक
रस्ते वाहतूक -महाराष्ट्रात १९५१ साली
सुमारे ३०००० कि मी लांबीचे रस्ते होते. २०११ नुसार रस्त्याची लांबी २,४१,७१२ कि मी आहे.
राष्ट्रीय महामार्ग - राज्यात राष्ट्रीय महामार्गाची लांबी
४,३६७ कि मी आहे. महाराष्ट्रात पुढील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग
आहेत.
* मुंबई- नाशिक- आग्रा महामार्ग क्रमांक
३ याची लांबी ३९३ कि मी आहे.
* मुबई - पुणे - बंगळूरू - चेन्नई
महामार्ग क्रमांक ४ लांबी ३७१ कि मी आहे.
* न्हावाशेवा - कळ्म्बोरी - पळस्पे
महामार्ग क्रमांक ४ ब लांबी २७ कि मी आहे.
* हाजिरा - सुरत - नागपूर - कोलकाता
महामार्ग क्रमांक ६ लांबी ८१३ कि मी आहे.
* वाराणसी - नागपूर - हैदराबाद -
बंगळूरू महामार्ग क्रमांक ७ लांबी ३३६ कि मी आहे.
* मुंबई - अहमदाबाद - जयपूर - दिल्ली
महामार्ग क्रमांक ८ लांबी १२८ कि मी आहे.
* पुणे - सोलापूर - हैदराबाद - विजयवाडा
महामार्ग क्रमांक ९ लांबी ३३६ कि मी आहे.
* सोलापूर - वीजापुर - चित्रदुर्ग
महामार्ग क्रमांक १३ लांबी ४३ कि मी आहे.
* निजामाबाद - जगदलपुर - महामार्ग
क्रमांक १६ लांबी ३० कि मी आहे.
* पनवेल - गोवा - मंगलोर - एडापल्ली महामार्ग क्रमांक १७ ४८२ कि मी आहे.
* पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्ग
क्रमांक ५० लांबी १९२ कि मी आहे.
* नागपूर - अब्दुलागंज महामार्ग क्रमांक
६९ लांबी ५५ कि मी आहे.
* रत्नागिरी - कोल्हापूर महामार्ग
क्रमांक २०४ लांबी १२६ कि मी आहे.
* सोलापूर - औरंगाबाद - धुळे महामार्ग
क्रमांक २११ कि मी लांबी आहे.
* कल्याण - अहमदनगर - नांदेड - निर्मल
-महामार्ग क्र २२२
* महाराष्ट्रातील मुंबई पुणे हा सहा
पदरी महामार्ग असून तो महाराष्ट्रातील पहिला व देशातील पहिला सहापदरी रस्ता होता.
·
रस्त्यांचे वर्गीकरण करणारी
रस्त्यांबाबतची योजना – नागपूर योजना (१९४१-६९)
·
राज्यातील सर्वात मोठा महामार्ग – क्र. ६ (धुळे-कोलकाता)
·
राज्यातील सर्वात लहान महामार्ग – क्र. ४ ब (नाव्हाशेवा-पळस्पे-२७ किमी)
·
राज्यात सुरु होऊन राज्यातच
संपणारे महामार्ग – १) पुणे-नाशिक - क्र. ५० २)
महामार्ग क्र. ४ ३)
रत्नागिरी-कोल्हापूर क्र. २०४ ४)
सोलापुर-धुळे क्र. २११
·
राज्यांची रस्त्यांची घनता (१००
चौ कि.मी. मार्गे) – ८७ कि.मी.
·
रस्त्याच्या घनेतत महाराष्ट्राचा
क्रमांक – ४ तर पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात
सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत.
·
रस्ते बांधणीला चालना देण्यासाठी १९९६ साली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास
महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाने बांधा वापरा व हस्तांतरित करा हे तत्व
अवलंबिले आहे.
·
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग एम.एस.आर.डी.सी. नेच बांधला आहे.
· भारतील सर्वाधिक लांबीचे रस्ते महाराष्ट्रात आहेत.
महाराष्ट्रातील रेल्वे वाहतूक
भारतीय उपखंडात १८४० साली ब्रिटीश
कोर्पोरेशानला रेल्वे बांधण्यास परवानगी मिळाली. प्रथम मुंबई पासून उत्तरेस आणि
पूर्वेस तसेच कोलकत्त्यापासून उत्तरेस आणि पश्चिमेस रेल्वे बांधण्यास सुरवात झाली.
भारतात पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे दरम्यान सुरु झाली. महाराष्ट्रामध्ये
२०१२ सालानुसार रेल्वेमार्गाची एकूण लांबी ५,९८४ कि मी कोकण रेल्वे ३८२ कि मी आहे. गेल्या ५१ वर्षात
राज्यामध्ये रेल्वे मार्गाची लांबी फक्त १८.४ टक्क्यांनी वाढली.
रेल्वे मार्गाचे प्रकार
रुंद मार्ग (ब्रॉड गेज) - या
मार्गातील दोन रूळामध्ये १.६७ मीटर अंतर असते.
मध्यम रुंद मार्ग (मीटर गेज) - या
मार्गातील दोन रुळातील अंतर १ मीटर असते.
अरुंद मार्ग (न्यरो गेज ) - या
मार्गातील दोन रुळातील अंतर ०.७६२ मीटर असते.
प्रमुख ब्रॉडगेज रेल्वेमार्ग -
महाराष्ट्र राज्य
·
मुंबई - दिल्ली (मध्य रेल्वे)
·
मुंबई - दिल्ली (पश्चिम रेल्वे)
·
मुंबई - चेन्नई (ग्रांड ट्रक)
·
दिल्ली - चेन्नई (ग्रांड ट्रक)
·
मुंबई - दिल्ली (मुंबई - सिकंदराबाद)
·
मुंबई - कोलकाता
·
मुंबई - कोल्हापूर
महाराष्ट्रातील अंतर्गत ब्रॉडगेज
·
पुणे - मिरज,
·
मिरज - कोल्हापूर,
·
मांजरी - वणी - राजूर,
·
मनमाड - औरंगाबाद,
दौड - मनमाड,
·
चाळीसगाव - धुळे,
·
तदळी - घुगुस,
·
औरंगाबाद - जालना,
·
परळी वैजनाथ - उदगीर,
जलंब - खामगाव,
·
कन्हान - रामटेक,
·
दौड - बारामती,
·
कर्जत - खोपोली,
·
बडनेरा - अमरावती,
तुमसर रोड - तिरोडा,
·
नरखेड - अमरावती,
· पूर्णा - खंडवा,
महाराष्ट्रातील न्यारोगेज
·
नेरळ - माथेरान,
·
मुर्तीजापूर - अचलपूर -यवतमाळ,
·
पाचोरा - जामनेर,
·
लातूर - चंद्रपूर, पुलगाव - आर्वी,
·
महाराष्ट्रात प्रमुख सहा लोहमार्ग जातात.
·
महाराष्ट्रातील ७२.७% मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे.
·
राज्यातील लोहमार्गांची घनता १९.४४ कि.मी. असून महाराष्ट्र भारतात घनतेच्या
बाबतीत चौदाव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक घनता सोलापूर जिल्ह्यात आहे. (भारताची
रेल्वेची घनता १९.६९ कि.मी. इतकी आहे.)
·
कोकण रेल्वे कोकणातील सर्व
जिल्ह्यातून जाते. तिच्या ८४३ कि.मी. लांबी महाराष्ट्रात आहे.
·
कोकण रेल्वे औपचारिक उद्गघाटन १ मे १९९८ रोजी झाले. या मार्गावर ताशी १६० कि.मी. वेगाने जाणा-या वेगाने जाणा-या
बुलेटनची चाचणी घेण्यात आली.
·
मुंबई रेल्वे विकास महामंडळाची
स्थापना – १९९८
·
तीनही प्रकारचे रेले मार्ग एकत्र
येतात – मिरज
·
महाराष्ट्रातील दुमजली गाडी – सिंहगड एक्स्प्रेस (पुणे-मुंबई)
·
महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर व गोंदिया दरम्यान धावते.
· मध्य रेल्वेने राज्यात पर्यटनाचा विकास होण्यासाठी १६ जाने. २००४ पासून डेक्कन ऑडिसी ही लक्झरी पर्यटन रेल्वे सुरु केली आहे. ही रेल्वे मुंबई-जयगड-गणपती पुळे-रत्नागिरी-भाट्ये बीच-सिधुदुर्ग-तरकारली-सावंतवाडी-गोवा-पुणे-औरंगाबाद-अजिंठा व वेरुळ आणि नाशिक इ. स्थळांची सफर घडविते.
महाराष्ट्रातील विमानमार्ग वाहतूक
* महारष्ट्रात मुंबई हे एक
आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. अलीकडेच या विमानतळाचे टर्मिनल २ चे बांधकाम झाले. आणि
आता हे विमानतळ उच्च दर्जाचे झाले. या विमानतळाचे नाव शिवाजी आंतरराष्ट्रीय टर्मिनस असे ठेवण्यात आले.
* महाराष्ट्रातील अन्य विमानतळे -
मुंबईच्या खालोखाल पुणे,नागपूर,येथे विमानतळे आहेत. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाण
असल्यामुळे तेथील विमान वाहतुकीस त्याला महत्त्वा आहे.
* केंद्र सरकारने बांधलेली विमानतळे
-सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अकोला, येथे आहेत.
* राज्य सरकारने बांधलेली विमानतळे
-कराड, उस्मानाबाद, धुळे, चंद्रपूर, रत्नागिरी, जळगाव, फलटण, भंडारा, येथे आहेत.
महाराष्ट्रातील जलवाहतूक
राज्यातील ७२० कि मी लांबीच्या
किनारपट्टीवर मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरूपोर्ट ट्रस्ट जे एन पी टी, ही दोन बंदरे आहेत.
जे एन पी टी हे देशातील सर्वात मोठे
कंटेनर वाहतूक करणारे बंदर आहे आणि आंतरराष्ट्रीय बंदरात १०० पैकी २४ व्या
स्थानावर आहे. मुंबई व न्हावाशेवा बंदर हे आंतरराष्ट्रीय बंदर आहेत.
* महाराष्ट्रातील अन्य बंदरे -डहाणू, कल्याण, धरमतर, रत्नागिरी, बेलापूर, सातपाटी, वर्सोवा, राजपुरी, पूर्णगड, रेडी, दातीवारा,मोरा, दिघा, जैतापूर, वेंगुर्ला, तुर्भे, करंजा, हर्णे, विजयदुर्ग, बेलापूर, रेवस, दाभोळ, देवगड, मानोरी, अलिबाग, जयगड, आचरे.
महराष्ट्राविषयी इतर माहिती :
·
भारतातील पहिले उपग्रह दळणवळण
केंद्र- आर्वी (जुन्नर-जि.पुणे) येथे १९७१
मध्ये स्थापन झाले. तर दुसरे केंद्र १९७६ मध्ये डेहराडून येथे स्थापन करण्यात आले
आहे.
·
आंतरराष्ट्रीय संपर्क सेवेत
सुसूत्रता आणण्यासाठी राज्यात केंद्राने उभारलेली केंद्रे – नागपूर व मुंबई
·
नियततालिकांच्या प्रसारणाच्या
बाबतीत उतरता क्रमांक – १) उत्तर प्रदेश २) दिल्ली ३)
महाराष्ट्र
·
महाराष्ट्र राज्य लोक साहित्य
मंडळाची स्थापना – १९५६
·
मराठी भाषा व साहित्याचा
सर्वांगिण विकास करणे तसेच इतिहास व कला क्षेत्रातील वारसा जपण्यासाठी १९६० रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य
परिषदेची स्थापना झाली.
·
महाराष्ट्रातील नियोजित उपग्रह
स्थानक – न्हावाशेवा (रायगड)
·
राज्य शासन छोट्या ४८ बंदरांचा
विकास करण्यासाठी बांधा, मालक व्हा, चालवा व हस्तांतरित करा या तत्वाचा वापर करणार आहे.
त्यासाठी १९६६ मध्ये महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत
रेवस आवारे हे बहुउपयोगी बंदर व दिघी हे बंदर रासायनिक पदार्थांचे स्थान म्हणून
विकसित करण्यात येणार आहे.