नंदुरबार जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.
१ जुलै १९९८ रोजी नंदुरबारचे धुळे जिल्ह्यातून विभागणी झाली. जिल्ह्याचे मुख्यालय
नंदुरबार शहरात आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५०३५ वर्ग कि. मी. आहे आणि सन २००१ च्या
जनगनणे प्रमाणे जिल्ह्याची लोकसंख्या १.३११.७०९ आहे व त्यातून १५.४५% लोकसंख्या
शहरी आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या दक्षिण आणि दक्षिण पूर्व बाजूला धुळे जिल्हा आहे.
नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत. गुजराथ राज्य वायव्य
सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य
जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर आहे. नंदुरबार जिल्ह्यात ६ तालुके आहेत. या
तालुक्यांमध्ये नवापूर, अक्कलकुवा, अक्राणी (धडगाव), तळोदा, शहादा, नंदुरबार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सरासरी वार्षिक पाऊस 32 इंच 30 इंच आहे. या जिल्ह्यात पावसाळा, अनियमित आहे. कापूस, ज्वारी, मका, गहू, बाजरी आणि तांदूळसारखे पिके प्रामुख्याने जिल्ह्यात घेतली
जातात.
महाराष्ट्रातील सर्वांत उत्तरेकडील
जिल्हा असे नंदुरबार जिल्ह्याचे वर्णन केले जाते. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५०३५
कि.मी.² इतके आहे. २०११ च्या गणनेनुसार
जिल्ह्याची लोकसंख्या १३,०९,१३५ इतकी आहे. नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्याच्या सीमा लाभल्या
आहेत. गुजराथ राज्य पश्चिमोत्तर सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या पूर्वोत्तर सीमेवर आहे.
राज्याच्या वायव्य सीमेवर असलेल्या या जिल्ह्याच्या उत्तरेस गुजरात व मध्य प्रदेश
या राज्यांचा भाग आहे.
जिल्ह्याच्या पूर्वेला मध्य प्रदेश व धुळे जिल्हा, दक्षिणेला धुळे जिल्हा; आणि पश्र्चिमेला गुजरात राज्य आहे.
जिल्ह्याच्या उत्तर भागात सातपुड्याची पर्वतरांग असून या पर्वतरांगांमुळे नंदुरबार, मध्यप्रदेश व गुजरात राज्यांपासून वेगळा
झाला आहे. जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याच्या
पश्र्चिम व उत्तर भागात पावसाचे प्रमाण जास्त असून, पूर्व ते दक्षिण भागात हेच प्रमाण कमी
आहे. पावसाळ्यात जिल्ह्यातील तापमान अधिक दमट असते.
चतुःसीमा
नंदुरबार
जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत. गुजरात राज्य वायव्य सीमेवर,
तर
मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे (उदा.
खेडदिगर व खेतिया) ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यांत विभागली
गेली आहेत.
जिल्ह्यातील तालुके
·
अक्कलकुवा
·
अक्राणी
·
तळोदा
·
नंदुरबार
·
नवापूर
·
शहादा
·
धडगाव
पर्यटन
·
तोरणमाळ हे
सातपुड्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तेथे यशवंत तलाव व सिताखईची दरी आहे आणि एक
धबधबाही आहे.
·
उनपदेव-सुनपदेव
(शहादा तालुका) येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
इतर
नंदुरबार
हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील लोकसभा व
सर्व विधानसभा मतदार
संघ हे राखीव आदिवासी मतदार
संघ आहेत.