ओडिशा
ओडिशा (मराठी नामभेद: ओरिसा ; रोमन लिपी: Odisha) भारत देशाच्या २९ राज्यांपैकी एक राज्य
आहे. ओडिशा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर स्थित असून त्याच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, उत्तरेला पश्चिम बंगाल व झारखंड, पश्चिमेला छत्तीसगढ, नैऋत्येलातेलंगणा तर दक्षिणेला आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत. भुवनेश्वर ही ओडिशाची राजधानी व सर्वात मोठे शहर
आहे. क्षेत्रफळानुसार ओडिशा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या
क्रमांकाचे मोठे राज्य आहे. ओडिशाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
पुरी येथील जगन्नाथ मंदिर, कोणार्क येथील सूर्य मंदिर इत्यादी जगप्रसिद्ध सांस्कृतिक स्थाने
असलेल्या ओडिशामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचे अनेक ठसे आढळतात.
इतिहास
ऐतिहासिक
काळात ओडिशा कलिंग साम्राज्याचा भाग होता. इ.स.पूर्व २६१
मध्ये सम्राट
अशोकने कलिंगवर
आक्रमण केले ज्याची परिणतीकलिंगच्या युद्धात झाली.
भूगोल
ओडिशा
हे भरपूर खनिज संपत्ती असलेले राज्य आहे. छोटा नागपूरचे पठार व पूर्व घाट या
राज्यात एकत्र येतात आणि या दोहोंतील खडकांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे
ओडिशामध्ये मोठय़ा प्रमाणावर खनिजे मिळतात .ओडिशाच्या पूर्वेस
औद्योगीकरण व सामाजिक विरोध
तत्कालीन
ओडिशातील (आताच्या झारखंड मधील) जमशेदपूर येथे पहिला स्वदेशी पोलाद कारखाना
स्थापन झाला, आणि
या भागातील खनिज संपत्तीमुळे या प्रदेशांचे मोठ्या
प्रमाणात उद्योगिकीकरण झाले. मात्र गेल्या ६० वर्षांत विकासप्रकल्पांसाठी सुमारे ६
कोटी ग्रामस्थांनी आपली घरे, जमिनी गमावल्या. त्यापैकी वीस लक्ष
ग्रामस्थ एकट्या ओडिशातील आहेत. विकासप्रकल्पांतून स्थानिकांना लाभ मिळत नसल्याचा
अनुभव त्यांनी जवळपास सहा दशके घेतला आहे. त्यातून शहाणे झालेले स्थानिक आता येऊ
घातलेल्या प्रकल्पांना विरोध करत आहेत.