महाराष्ट्राचे भारतातील स्थान –
भारतातील २९ घटकराज्यांपैकी महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले राज्य आहे.भारताच्या मध्यवर्ती भागात महाराष्ट्र राज्य आहे . क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा राजस्थान, मध्य प्रदेशानंतर देशात तिसरा क्रमांक लागतो.महाराष्ट्र देशाच्या ९.३६% क्षेत्रफळाने व्यापलेला आहे.महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसित राज्य आहे. महाराष्ट्र जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे.
स्थान
– १५.४८ उत्तर अक्षरवृत्त ते २२.६ उत्तर अक्षरवृत्त (१५ ‘३५’४०” ते २२’२’१३” उत्तर
अक्षांश)
७२.३६ पुर्व रेखावृत्त ते -
८०.५४ पुर्व रेखांश दरम्यान.(७२’३८’४५” ते ८०’ ५३’१७”
पूर्व रेखांश)
( संदर्भ: मराठी विश्वकोश खंड :१२)
क्षेत्रफळ
– ३,०७,७१३ चौ.कि.मी./ (१,१८,८०९ चौ. मैल)
लांबी
– पुर्व पश्चिम
लांबी ८०० कि.मी. व
उत्तर दक्षिण ७२० कि.मी. आहे.
राज्याच्या किनारपट्टीची लांबी – ७२० कि.मी.
नोट
:
महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांची लांबी
१) बृह्न्मुंबई ( मुंबई आणि मुंबई उपनगर
) : ११४ कि.मी .
२) पालघर आणि ठाणे : १२७ कि.मी.
३) रायगड :१२२ कि.मी .
४) रत्नागिरी :२३७ कि.मी .
५) सिंधुदुर्ग: १२० कि.मी . ( संदर्भ: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१५-२०१६)
आकार :
महाराष्ट्राचा
सर्वसाधारण
आकार
त्रिकोणाकृती
असून
दक्षिणेकडे
चिंचोळा
तर
उत्तरेकडे
रुंद
होत
गेलेला
आहे
.पाया
कोकणात आणि निमुळते
टोक
पूर्वेश
गोंदिया
जिल्ह्याकडे
आहे
.
नैसर्गिक
सीमा –
महाराष्ट्राच्या
वायव्येस सातमाळा डोंगररांगा, गाळण टेकड्या
व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या आहेत. उत्तेरस
सातपुडा पर्वत, त्याच्या
पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत.राज्याच्या
ईशान्येस दरकेसा टेकड्या व पूर्वेस चिरोली टेकड्या,गायखुरी आणि भामरागड डोंगर आहे.
राज्याच्या
पश्चिमेस अरबी समुद्र असून राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील दमण गंगा नदीपासून
दक्षिणेकडे पठारावर हिरण्यकेशी नदी आणि कोकणात तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे.
राजकीय
सीमा –
महाराष्ट्राला
एकूण ६ राज्यांच्या सीमा स्पर्श करतात.
यापैकी सर्वाधिक लांब सीमा मध्यप्रदेश बरोबर असून सर्वात कमी सिमा गोवा या राज्याबरोबर आहे.
तसेच दादरा
नगर हवेली ह्या केंद्रशासित प्रदेशाची सिमा लागते.
|
राज्य |
दिशा |
सिमेवरील जिल्हे |
एकूण |
|
गुजरात |
वायव्य |
पालघर ,ठाणे, नाशिक, धुळे,
नंदुरबार |
५ |
|
मध्यप्रदेश |
उत्तर |
नंदुरबार, धुळे, जळगाव,
बुलढाणा, अमरावती, नागपूर,
भंडारा व गोंदिया |
८ |
|
छत्तीसगढ |
पुर्व |
गोंदिया व गडचिरोली |
२ |
|
तेलंगाना |
आग्नेय |
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ,
नांदेड |
४ |
|
कर्नाटक |
दक्षिण |
नांदेड, लातूर, उस्मानाबाद,सोलापूर, सांगली,
कोल्हापूर,सिंधुदुर्ग |
७ |
|
गोवा |
दक्षिण |
सिंधुदुर्ग |
१ |
जिल्हा
विभाजन –
- रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग वेगळा – १ मे १९८१
- औरंगाबाद जिल्ह्यातून जालना वेगळा– १ मे १९८१
- उस्मानाबाद मधुन लातूर वेगळा– १६ ऑगस्ट १९८२
- चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा– २६ ऑगस्ट १९८२
- बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर वेगळा – ४ ऑक्टोंबर १९९०
- अकोला जिल्ह्यातून वाशिम वेगळा – १ जुलै १९९८
- धुळे जिल्ह्यातुन नंदुरबार वेगळा - १
जुलै १९९८
- परभणी जिल्ह्यातुन हिंगोली वेगळा – १ मे १९९९
- भंडारा जिल्ह्यातून गोंदिया वेगळा– १ मे १९९९
- परभणी जिल्ह्यातुन हिंगोली वेगळा – १ मे १९९९
- ठाणे जिल्ह्यातुन पालघर वेगळा - १ ऑगस्ट २०१४
Short Trick: रसी औजा उला चंग बुबु अवा धुन पही भागो ठापा
राज्याचे प्रशासकिय विभाग – राज्याचे
मुख्य ६ प्रशासकिय विभाग असून १२ उपविभाग आहेत.
|
विभाग |
जिल्हे |
संख्या |
|
कोकण |
पालघर ,ठाणे, मुंबई
उपनगर,
मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
७ |
|
पुणे |
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर |
५ |
|
नाशिक |
अहमदनगर, नाशिक, धूळे, जळगाव, नंदुरबार |
५ |
|
औरंगाबाद (मराठवाडा) |
औरंगाबाद, जालना, बीड,
उस्मानाबाद, नांदेड, परभणी,
हिंगोली, लातूर |
८ |
|
अमरावती (विदर्भ) |
अमरावती, यवंतमाळ, बुलढाणा,
अकोला, वाशिम |
५ |
|
नागपूर (विदर्भ) |
नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा,
गोंदिया,वर्धा |
६ |
विभागानुसार वाटून दिलेले कामे -
|
पुणे -
शिक्षण, फलोद्यान, समाजकल्याण,
सामाजिक वनिकरण, क्रिडा, साखर, नगरचना
सहकार, शेती पशुसंवर्धन मुंबई - माहिती प्रसिध्दी, दुग्धविकास, आरोग्य, उद्योग, विक्रीकर नाशिक - आदिवासी कल्याण नागपूर - खाणकाम व हातमाग |
राज्यातील
काही भागांतील वैशिष्ट्य पुर्ण नावे
–
- कोकण: भारताचा पश्विम किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या मधे असलेला भूमीचा पट्टा महाराष्ट्रात व गोव्यात कोकण म्हणून ओळखला जातो. याच पट्ट्याला
दक्षिणेत, म्हणजे कर्नाटक
व केरळ मध्ये मलबार किनारा म्हणून ओळखतात. कोकणची भूमी
अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या
बागा, फणस, काजू, कोकमाची
झाडं आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती. असा निसर्गाचा वरद हस्त कोकण
प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच स्थित आहे.कोकणाचे प्राचीन नाव अपरांत आहे .सह्याद्रीच्या
पायथ्यालगतच्या कोकण भागास तळ
कोकण म्हणतात .
- मावळ: सह्याद्री
माथा तसेच त्याच्या लगतचा पूर्वेकडील उतरणीचा भाग मावळ प्रांत या नावाने
ओळखला जातो .
- देश: सह्यांद्रीच्या
पूर्व बाजूला महाराष्ट्राचा देश हा प्रादेशिक विभाग आहे. यामध्ये एकूण ७
जिल्हे आहेत. यामध्ये पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली , कोल्हापूर आणि
नाशिक विभागातील नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो .
- घाटमाथा : सह्यांद्रीच्या पर्वताच्या उंचवट्याचा भाग घाटमाथा म्हणून
ओळखला जातो.
- खानदेश : उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव
या भागांना खानदेश असे म्हणतात. या भागात जमीन काळी आणि सुपीक असून कापूस व
केळी हे पिके प्रसिद्ध आहेत.
- मराठवाडा : महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्यास मराठवाडा असे म्हणतात. मराठवाड्यात
एकूण ८ जिल्हे आहेत.गोदावरी तीरावर नेवासे ,पैठण ही पवित्र तीर्थस्थळे आहेत .
- विदर्भ : विदर्भाचा
पुर्व भाग झाडी आणि मध्य व पश्चिम भाग वऱ्हाड या नावाने ओळखले जाते . पूर्णा,वर्धा,पेनगंगा,वेनगंगा या नद्यांच्या
खोऱ्याच्या प्रदेशास विदर्भ व वऱ्हाड असे म्हणतात. येथील जमीन सुपीक व काळी
कसदार असून कापूस, संत्रा, इ. पिके येतात. विदर्भात अमरावती
विभागातील ५ जिल्हे आणि नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांचा असे एकूण ११
जिल्ह्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विशेष
·
महाराष्ट्राचा
राज्य वृक्ष
-
आंबा
·
महाराष्ट्राचे
राज्य फुल
- मोठा बोंडारा किंवा तामण
·
महाराष्ट्राचा
राज्य पक्षी
-
हारावत (कबुतरातल्या जातीचा)
·
महाराष्ट्राचा
राज्य प्राणी
-
शेकरु (खारीची जात)
महाराष्ट्रातील पहिल्या व्यक्ती
·
महाराष्ट्राचे
पहिले मुख्यमंत्री
-
यशवंतराव चव्हाण
·
महाराष्ट्राचे
पहिले राज्यपाल
-
श्री. प्रकाश
·
अखिल भारतीय मराठी
साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष
न्या. रानडे
·
भारतरत्न मिळविणारे
पहिले महाराष्ट्रीयन
-
महर्षी धो. के .कर्वे(१९५८)
·
ज्ञानपीठ पुरस्कार
मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन वि. स. खांडेकर(१९७४)
·
रॅमन मॅगसेसे
पुरस्कार मिळविणारेपहिले महाराष्ट्रीयन विनोबा भावे
·
महाराष्ट्रातील
पहिली शिक्षिका
-
सावित्रीबाई फुले
·
महाराष्ट्रातील
पहिली महिला डॉक्टर
-
डॉ. आनंदीबाई जोशी
·
पहिली महिला रेल्वे
इंजिन चालक
-
सुरेखा भोसले
· महाराष्ट्रातील पहिले रॅग्लर - रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
महाराष्ट्रातील पहिल्या संस्था
·
महाराष्ट्रातील
पहिले विद्यापिठ
- मुंबई (१८५७)
·
महाराष्ट्रातील
पहिले कृषी विद्यापीठ
- राहुरी (१९६८)
·
महाराष्ट्रातील
पहिले आकाशवाणी केंद्र
- मुंबई (१९२७)
·
महाराष्ट्रातील
पहिले दुरदर्शन केंद्र
- मुंबई
·
महाराष्ट्रातील
पहिले जलविद्युत केंद्र
- खोपोली
·
महाराष्ट्रातील
पहिले अणूविद्युत केंद्र
- तारापूर
·
महाराष्ट्रातील
पहिले पवन विद्युत प्रकल्प
- जमसांडे - देवगड
·
महाराष्ट्रातील
पहिला सहकारी साखर कारखाना
- प्रवरानगर
·
महाराष्ट्रातील
पहिली सहकारी सूत गिरणी
- कोल्हापूर
·
महाराष्ट्रातील
पहिली कापड गिरणी
- मुंबई
·
महाराष्ट्रातील
पहिला लोहपोलाद प्रकल्प
- चंद्रपूर
·
महाराष्ट्रातील
पहिले उपग्रह दळणवळण केंद्र
- आर्वी (पूणे)
· महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल - ताजमहाल, मुंबई (१९०३)
महाराष्ट्रातील पहिल्या घटना
·
महाराष्ट्रातील
पहिले मातीचे धरण
- गंगापूर
·
महाराष्ट्रातील
पहिले पक्षी अभयारण्य
- कर्नाळा
·
महाराष्ट्रातील
पहिली सैनिकी शाळा
- सातारा (१९६१)
·
महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा
- पुणे
·
पुर्ण विद्युतीकरण
झालेला पहिला जिल्हा
- वर्धा
·
वाफेच्या
इंजिनावरील पहिली रेल्वे
- मुंबई ते ठाणे (१८५३)
·
विजेवर चालणारी
पहिली रेल्वे
- मुंबई ते कुर्ला (१९२५)
·
मराठी भाषेतील
पहिले दैनिक वर्तमानपत्र
- ज्ञानप्रकाश
·
मराठी भाषेतील
पहिले साप्ताहिक
- दर्पण
· मराठी भाषेतील पहिले मासिक - दिग्दर्शन
महाराष्ट्रातील सर्वात मोठे व सर्वात लहान
·
सर्वात मोठी टपाल
कचेरी
- मुंबई
·
सर्वात मोठे
नाटयगृह
- शण्मुखानंद सभागृह, मुंबई
·
क्षेत्रफळाने
सर्वात मोठा जिल्हा
- अहमदनगर
· क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
महाराष्ट्रातील सर्वात जास्त
·
सर्वात जास्त
लांबीची नदी
- गोदावरी
·
सर्वात जास्त
लोकसंख्येचा जिल्हा
- मुंबई उपनगर (८५,८७,५६१)
·
सर्वात जास्त
साक्षरता असलेला जिल्हा
- मुंबई उपनगर (८७.१४ %)
·
लोकसंख्येची घनता
सर्वात जास्त असलेला जिल्हा
- मुंबई शहर (२११९०)
·
सर्वाधिक नागरी
वस्तीचा जिल्हा
- पुणे
·
सर्वात जास्त
पावसाचे ठिकाण
- अंबोली
·
सर्वात जास्त
तापमान असलेला जिल्हा
- चंद्रपूर
·
सर्वात जास्त
तलांवाचा जिल्हा
- गोंदिया
·
सर्वात जास्त
वनांचे प्रमाण
- गडचिरोली
·
सर्वात जास्त
लोहमार्गाचा जिल्हा
- सोलापूर
·
सर्वात जास्त
राष्ट्रीय महामार्गाचा जिल्हा
- पुणे
·
सर्वात जास्त
विद्युत उत्पादक जिल्हा
- नागपूर
·
सर्वात जास्त
किनारपट्टी लाभलेला जिल्हा
- रत्नागिरी
·
सर्वात जास्त साखर
कारखाने असलेला जिल्हा
- अहमदनगर
·
सर्वात जास्त
स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा
- रत्नागिरी
·
सर्वात जास्त उंच
शिखर
- कळसुबाई
·
सर्वात जास्त
वेगवान रेल्वे
- इंद्रायणी एक्सप्रेस
· सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे - महाराष्ट्र एक्सप्रेस
महाराष्ट्रातील सर्वात कमी
·
सर्वात कमी
साक्षरता असलेला जिल्हा
- नंदूरबार (५६.०६%)
·
सर्वात कमी
लोकसंख्येचा जिल्हा
- सिंधूदुर्ग (८,६१,६७२)
·
लोकसंख्येची घनता
सर्वात कमी
- गडचिरोली (६७)
·
सर्वात कमी वनांचे
प्रमाण असलेला जिल्हा
- उस्मानाबाद
·
सर्वात कमी नागरी
वस्तीचा जिल्हा
- गडचिरोली
· सर्वात कमी पावसाचे ठिकाण - उस्मानाबाद
जिल्हे व त्यांची टोपण नावे
·
मुंबई
- भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी, सात बेटांचे शहर
·
पुणे
- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी.
·
नाशिक
- मुंबईचा गवळीवाडा, मुंबईची परसबाग, द्राक्षांचा जिल्हा
·
नागपूर
- संत्र्यांचा जिल्हा
·
औरंगाबाद
- मराठवाडयाची राजधानी, अजिंठा –वेरुळ लेण्यांचा जिल्हा
·
कोल्हापूर
- गुळाचा जिल्हा, कुस्तीवीरांचा जिल्हा, ऐतिहासिक राजधानी
·
बीड
- ऊस कामगारांचा जिल्हा, जुन्या मराठी कवींचा जिल्हा, देवदेवळांचा जिल्हा.
·
सातारा
- शूरांचा जिल्हा
·
सोलापूर
- ज्वारीचे कोठार
·
नंदूरबार
- आदिवासींचा जिल्हा
·
चंद्रपूर
- गोंड राजाचा जिल्हा
·
गोंदिया
- तलावांचा जिल्हा
·
अमरावती
- देवी रुक्मिनी व दमयंतीचा जिल्हा
·
अहमदनगर
- साखर कारखान्यांचा जिल्हा
·
उस्मानाबाद
- भवानी मातेचा जिल्हा
·
जळगाव
- कापसाचे शेत, अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार
·
नांदेड
- संस्कृत कवींचा जिल्हा
·
बुलढाणा
- महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ
·
यवतमाळ
- पांढरे सोने पिकविणारा जिल्हा, कापसाचा जिल्हा
·
रायगड
- मिठागराचा जिल्हा, तांदळाचे कोठार, जलदुर्ग आणि डोंगरी किल्यांचा जिल्हा
· रत्नागिरी - देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा
जिल्हा व तेथील महत्वाची स्थळे
·
मुंबई - गेट वे ऑफ इंडिया, मंत्रालय, राजाबाई टॉवर, प्रिन्स ऑफ वेल्स वस्तू संग्रहालय, जिजामाता उद्यान, कमला नेहरु उद्यान, आरे दूध वसाहत, तुर्भे तेलशुध्दीकरण केंद्र, घारापुरीची कोरीव लेणी, हॉटेल ताजमहाल, जूहू चौपाटी, सहारा आंतराष्ट्रीय विमानतळ, हॅगींग गार्डन, जहांगीर आर्ट गॅलरी.
·
नाशिक - त्र्यंबकेश्वर येथील ज्योतीर्लिंग, काळाराम मंदीर, पंचवटी, ओझर येथील मिग विमानाचा कारखाना, मेरी, एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प.
·
धूळे
-
एकविरा देवीचे मंदीर, राजवाडे संशोधन मंदीर.
·
नंदूरबार -
शिरीषकुमारचे स्मारक, वाघेश्वरी देवीचे देऊळ, तोरणमाळ.
·
जळगाव -
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, फेकरी औष्णिक विद्युत केंद्र, चांगदेव मंदीर, पाटणादेवीचे मंदीर, यावल अभयारण्य, उपवनदेव – सुपनदेव येथील गरम पाण्याचे झरे.
·
रायगड - चोल येथील बौध्दकालीन लेणी, घारापुरी लेणी, श्रीहरीहरेश्वर येथील शिव मंदिर, माथेराण थं ड हवेचे ठिकाण, महाड येथील चवदार तळे, कर्नाळा अभयारण्य, पाली येथील बल्लाळेश्वर गणपती मंदिर.
·
रत्नागीरी
- थिबा राजाचा
राजवाडा, गणपतीपुळे, राजापूर येथील गरम पाण्याचे झरे, कुरबुडे बोगदा, स्वामी स्वरुपानंदाची समाधी.
·
सिंधुदुर्ग - अंबोली थंड हवेचे ठिकाण, वेगुर्ले, रेडी बंदर, सावंतवाडी, ओरस बुद्रूक, फोंडाघाट, सैतवडे धबधबा.
·
औरंगाबाद – जायकवाडी प्रकल्प, विद्यापीठ, बीबी का मकबरा, पाणचक्की, उच्च न्यायालयाचे खंडपिठ, देवगिरी किल्ला, खुल्ताबाद येथील औरंगजेबाची कबर, म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण, अजिंठा वेरुळ लेणी, घृष्णेश्वर मंदीर.
·
जालना- आनंदस्वामीचा मठ, मोतीबाग, जांब-रामदासाचे जन्मस्थळ.
·
परभणी- जिंतूर टेकडया, मराठवाडा कृषी विद्यापीठ, शिवाजी उद्यान, रोशन खान गढी, संत जनाबाई मंदिर, चारगणा येथील दगडी झुलता मनोरा.
·
हिंगोली - यलदरी व सिद्धेश्वर धरणे, औंढा नागनाथ येथील ज्योतीर्लिंग, नरसी येथील नृसिंह मंदिर.
·
बीड - कंकालेश्वराचे जल मंदिर, खजाना विहीर, अंबेजोगाई येथील जोगाई व खोलेश्वर मंदिर, मुकुंदराज यांची समाधी- परळी
औष्णिक विद्युत केंद्र, वैजनाथ मंदिर, मन्मथ स्वामीचे मंदिर,कपिलधार धबधबा, राक्षसभुवन येथील शनी मंदिर, सौताडा धबधबा.
·
उस्मानाबाद- धाराशीव लेणी, हजरत ख्वाजा शम्सुद्दीन गाझीचा
दर्गा, तुळजा भवानी मंदिर, नळदुर्ग येथील भुईकोट किल्ला, येडेश्वरीचे मंदिर.
·
लातुर -
गंजगोलाई, सुरतशालवाली दर्गा, केशवराज सिद्धेशवर मंदिर, मल्लिनाथ महाराज मठ नीळकंठेश्वर मंदिर, रेणुकादेवी मंदिर.
·
नांदेड - विष्णुपुरी प्रकल्प, श्री गोविंदसिंगजी समाधी, माहूर येथील रेणुकादेवी मंदिर सहस्त्रकुंड धबधबा.
·
नागपूर - विद्यापीठ, पेंच राष्ट्रीय उद्यान, सीताबर्डीचा किल्ला, बुटीबोरी औद्योगिक वसाहत, कामठी येथील दगडी कोळशाच्या खाणी, रामटेक, रामसागर तलाव, हरीहर स्वामींचे मंदिर.
·
भंडारा - खांब तलाव, तुमसर येथील मॅंगनीज शुद्धीकरण कारखाना.
·
गोंदिया - नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य.
·
चंद्रपूर - ताडोबा राष्ट्रीय उद्यान, महाकाली मंदिर, गोंडकालीन किल्ला, बल्लारपूर कागद गिरणी, दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र, वरोरा येथील आनंदवन, सोमनाथ-मुल.
·
गडचिरोली- हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प, चपराळा अभयारण्य.
·
बुलढाणा - लोणार सरोवर, देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिर, शेगाव-गजानन महाराजाची समाधी
·
अकोला - पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, नर्नाळा अभयारण्य, मुर्तिजापूर-संत गाडगे महाराज आश्रम.
·
वाशिम - नृसिंह सरस्वती मंदिर.
·
अमरावती- विद्यापीठ, तपोवन, श्रद्धानंद छात्रालय, चिखलदरा थंड हवेचे ठिकाण, परतवाडा -लाकुड बाजारपेठ, मोझरी संत तुकडोजी महाराज समाधी.
·
यवतमाळ- केदारेश्वर मंदिर, रंगनाथ स्वामीचे मंदिर, उनकेश्वर गरम पाण्याचा झरा.
·
वर्धा - सेवाग्राम, पवनार आश्रम, लक्ष्मीनारायण मंदिर, पुलगाव-रासायनिक खताचा कारखाना.
·
अहमदनगर -
चांदबीबीचा महाल, शनी-शिंगणापूर, राहुरी कृषी विद्यापीठ, राळेगण सिद्धी, हिवरे बाजार, पुणतांबे-चांगदेव समाधी, शिर्डी, सिद्धटेक-श्री सिद्धीविनायक,भंडारदरा धरण, मढी-कानिफनाथ मंदिर.
·
पुणे
- पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, राजा केळकर वस्तू संग्रहालय, महात्मा फुले वस्तू संग्रहालय, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, वेधशाळा, अप्पूघर, भीमाशंकर ज्योतीर्लिंग, आळंदी संत ज्ञानेश्वरांची समाधी, देहू, राजगुरुनगर,लोणावळा, सासवड-सोपानदेवाची समाधी,ऊरळीकांचन, जेजुरी-खंडोबाचे देवस्थान, भाटघर-लॉईड धरण, आर्वी-उपग्रह दळणवळण केंद्र.
·
सातारा - सज्जनगड-समर्थ रामदास स्वामीची समाधी, महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण, पाचगणी थंड हवेचे ठिकाण, वाई-नाना फडणविसाचा वाडा, शिखर-शिंगणापूर.
·
सांगली - मिरज- मीरासाहेब अवलियाचा दर्गा, सागरेश्वर अभयारण्य, तासगाव.
·
सोलापूर - सिद्धेश्वर मंदिर, पंढरपूर-विठ्ठल मंदिर.
·
कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिर, रंकाळा तलाव, शाहुपुरी गुळाची बाजारपेठ, खासबाग, चित्रनगरी, राधानगरी