अकोला
जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अकोला हे
आहे.अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावतीप्रशासकीय विभागात येतो. जुलै १, इ.स. १९९८ रोजी
महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला ववाशीम हे
दोन नवे जिल्हे निर्माण झाले.जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशीम जिल्हा तर
पश्चिमेसबुलढाणा जिल्हा आहे.
अकोला जिल्ह्यातील तालुके- अकोला, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, अकोट व तेल्हारा. अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,४३१
चौ.कि.मी असून लोकसंख्या १६,३०,२३९
इतकी आहे. अकोला जिल्ह्यात विविध भूरूपे आहेत. पूर्णा नदीच्या खोऱ्यायाचा बहुतेक भाग सपाट मैदानाचा आहे. जिल्ह्यात
उत्तर भागात गाविलगडचे डोंगर, तर दक्षिण भागात अजिंठ्याचे डोंगर आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस नरनाळा किल्ला आहे. भूरूपांच्या उंचसखलपणावरून प्राकृतिक रचना समजते.
अकोला जिल्ह्याचा इतिहास -
अकोला हा विदर्भातील जिल्हा आहे. निजामशाहीच्या काळात
हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात-१९व्या शतकात- बेरार
प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई
झाली होती. जुन्या किल्ल्यांचे अवशेष आजही अकोल्यात दिसतात. असदगड, नरनाळा हे त्यापैकीच होत.नरनाळा किल्ला
आणि तेथील वन्यजीव अभयारण्य ह्या तर आहेतच अकोल्याच्या लक्षणीय गोष्टी. कोणत्याही
गावाच्या नावाशी एखादी घटना, कथा-दंतकथा किंवा एखादी व्यक्ती जोडलेली असते. अकोला या
शहराशीदेखील अकोलसिंग नावाच्या रजपूत सरदाराचा संबंध आल्याचा उल्लेख इतिहासात
आढळतो. त्यानेच हे शहर
वसविल्याचे सांगितले जाते व त्याच्या नावावरूनच शहराचे नाव अकोला ठेवण्यात आले.
अकोला हे उत्तर महाराष्ट्रातीलमहाराष्ट्राच्या
पूर्व भागात आहे.पूर्वी मध्य प्रदेशमध्ये मोडणारा हा जिल्हा १९५६ साली मुंबई
प्रांतात सामील करून घेण्यात आला व त्यानंतर १९६० मध्ये महाराष्ट्राच्या
स्थापनेबरोबरच अकोला जिल्ह्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला. अकोला जिल्हा
हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात येतो. जुलै १, इ.स.
१९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.त्यामुळे अकोला व
वाशीम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले.जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पुर्वेस
अमरावती जिल्हा, दक्षिणेस
वाशीम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.
भौगोलिक रचना -
अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व
भागात आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र अकोला हे आहे.अकोला जिल्हा हा अमरावती
प्रशासकीय विभागात येतो.जुलै १, इ.स. १९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला
जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व वाशीम हे दोन नवे जिल्हे निर्माण
झाले.जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस
वाशीम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.
विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान
अकोला जिल्ह्यातील तालुके- अकोला, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, अकोट वतेल्हारा. अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,४३१
चौ.कि.मी असून लोकसंख्या १६,३०,२३९
इतकी आहे.
वाहतूक व व्यापार
अकोला जिल्ह्यातील वाहतूक रस्ते व
लोहमार्गाने चालते. रस्ते राष्ट्रीय महामार्ग मुंबई - नागपूर - कोलकाता हा
राष्ट्रीय महामार्ग अकोला जिल्ह्यातून जातो. या मार्गावर बाळापूर,
अकोला,
कुरणखेड,
मूर्तिजापूर,
इत्यादी
ठिकाणे आहेत, प्रमुख
रस्ते तेल्हारा ते मंगरूळपीर मार्ग : तेल्हाऱ्याहून शेजारच्या वाशीम जिल्ह्यातील
मंगरूळपीरकडे हा मार्ग जातो. या मार्गावर अंदुरा, अकोला,
बार्शीटाकळी,
महान
आदी ठिकाणे आहेत. अकोट- वाशीम मार्ग : या मार्गावर पाटसूळ, चोहट्टा,
अकोला,
पातूर
इत्यादी ठिकाणे आहेत. मूर्तिजापूरहून अमरावती जिल्ह्यातील अचलपूरकडे व
कारंजामार्गे यवतमाळकडे मार्ग जातात. लोहमार्ग जिल्ह्यात अकोला व मूर्तिजापूर ही
दोन महत्त्वाची रेल्वे जंक्शने आहेत. जिल्ह्यातील लोहमार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ
विभागात मोडतात. मुंबई - नागपूर - कोलकाता लोहमार्ग: हा लोहमार्ग जिल्ह्यातून
पश्चिमेकडून पूर्वेस जातो. या मार्गावर पारस, अकोला,
बोरगाव
मंजू, काटेपूर्णा,
मूर्तिजापूर
आदी स्थानके आहेत. खांडवा - पूर्णा लोहमार्ग : हा लोहमार्ग जिल्ह्यातून उत्तर-दक्षिण
गेला आहे. या मार्गावर अकोट, पाटसूळ, अकोला,
बार्शीटाकळी
इत्यादी स्थानके असून हा मार्ग पुढे वाशीमहून हिंगोलीमार्गे पूर्णाकडे जातो. सध्या
पुर्णा ते अकोला रेल्वेमार्ग ब्रॉडगेज झाला आहे. ग्यामार्गे अकोला-कुचीपूडी
(हॅद्राबाद ) आणि नागपूर्-कोल्हापूर रेल्वे सुरु आहेत. अकोला-खण्डवा मार्ग अजुनही
नॅरोगेज असून तो ब्रॉडगेज झाल्यास वर्हाड परीसराच्या विकासाला चालना मिळेल.
अकोला पर्यटन -
नरनाळा
अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर
सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे.
गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट वयाघ्रप्रकल्प
सुरू होतो. पायथ्या पासुन गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक
दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता
नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास
परवानगी नाही.
भौगोलिक माहिती
गड जमीनीपासून ३१६१ फुट उंच आहे. गडाचा
विस्तार हा ३८२ एकर असून गडाच्या कोटाची (तटबंदी) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान
व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुदा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरीदुर्ग
असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखल्या जात असून जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग
पूर्व-पश्चिमेला आहेत.
किल्ल्याबद्दल
गडाच्या प्रवेशाला ५ दरवाजे लागतात
त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानुर दरवाजा,
मग
मोंढा दरवाजा, त्यानंतर
अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे
करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे.
याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गुळफुटाने
वाहावे व तडक गड उतरावा. तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये,
असे
मानतात.
नद्या
अकोला
जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा आहे.
ही नदी जिल्ह्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्णा नदीस शहानूर, पठार, विद्रूपा, आस,
इत्यादी
नद्या उत्तरेकडून येऊन मिळतात . उमा, काटेपूर्णा, मोर्णा वमन ह्या
नद्या दक्षिणेकडून येऊन मिळतात. याशिवाय निर्गुणा ही
मन नदीची उपनदी जिल्ह्यातून वाहते. वाशीम जिल्ह्यात काटेपूर्णा
नदीचा उगम आहे. ही नदी बार्शीटाकळी, मूर्तिजापूर व अकोला या तालुक्यांतून
वाहते. ती लाईत गावाजवळ पूर्णा नदीस मिळते. मूर्तिजापूर तालुक्यात सांगवी या
ठिकाणाजवळ पूर्णा व उमा नद्यांचा संगम झाला आहे. मन व म्हैस या नद्यांचा संगम
बाळापूर जवळ झाला आहे.
हवामान
अकोला
जिल्हा समुद्रापासून दूर आहे. जिल्ह्याचे हवामान साधारण्पणे उष्ण व कोरडे आहे.
उन्हाळा फार कडक असतो. मे महिन्यात
तापमान महत्तम असते. डिसेंबर महिन्यात
तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी
होते. जिल्ह्यातील बाळापूर, अकोला, मूतिजापूर
तालुक्यांत कमी पाऊस पडतो.
नैसर्गिक संपत्ती
अकोला
जिल्ह्यात गाविलगड व अजिंठ्याच्या डॊंगरराळ भागात जास्त वने आहेत. वनात साग ,
ऐन, खैर, अंजन,
इत्यादी
वृक्ष आढळतात. तसेच मोर, रानकोंबडा,
इत्यादी
पक्षीही वनांत आहेत. पातूर तालुक्यात साग, चंदन,
आढळते
तसेच चारोळीचे उत्पादनही
होते. जिल्ह्यात काटेपूर्णा अभयारण्य आहे.
पाणीपुरवठा
अकोला
जिल्ह्यात विहिरी व नद्या ही पाणीपुरवठ्याची मुख्य साधने आहेत. अकोट,
तेल्हारा,
पातूर,
बार्शीटाकळी
तालुक्यांत विहिरी जास्त आहेत. तेल्हारा तालुक्यात वान धरण आहे. याशिवाय महान,
मोर्णा
ही धरणे जिल्ह्यात आहेत. बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील धरण-प्रकल्प जिल्ह्यात
मोठा आहे. पातूर तालुक्यात मोर्णा व निर्गुणा यांच्यावर धरणे आहेत.
पिके
जिल्ह्यात
खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके होतात.
खरीप पिके
अकोला
जिल्ह्यात कापूस हे
महत्त्वाचे खरीप पीक आहे. अकोला, तेल्हारा, मूर्तिजापूर,
बाळापूर,
अकोट
या तालुक्यांत कापसाचे पीक जास्त होते. या शिवाय इतर तालुक्यांतही थोडाफार कापूस
होतो. खरीप ज्वारीच्या उत्पादनात
अकोला जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे . ज्वारीचे पीक अकोला,
बाळापूर,
बार्शीटाकळी
या तालुक्यांत सर्वात जास्त प्रमाणात घेतले जाते.
याशिवाय मूग, तूर, तांदूळ, भुईमूग, उडीद, सोयाबीन आदी
खरीप पिके जिल्ह्यात घेतली जातात.
रब्बी पिके
रब्बी
हंगामात जिल्ह्यात प्रामुख्याने गहू, हरभरा, जवस, करडई,
आदी
पिके होतात. जिल्ह्यात बागायती शेतीसुद्धा थोड्याप्रमाणात होत असून त्यात मुख्यत: संत्री, मिरची, ऊस, केळी, पेरू, बोरे, पपई
आणि टरबूज आदी
पिके घेतली जातात. तेल्हारा व अकोट तालुक्यात विड्याच्या पानांचे उत्पादन
होते.
वाहतूक व व्यापार
अकोला
जिल्ह्यातील वाहतूक रस्ते व लोहमार्गाने चालते. शिवनी विमानतल् हा अकोला शहराचा
विमानतल् आहे.
राष्ट्रीय
महामार्ग
मुंबई - नागपूर - कोलकाता हा
राष्ट्रीय महामार्ग अकोला जिल्ह्यातून जातो. या मार्गावर बाळापूर,
अकोला,
कुरणखेड,
मूर्तिजापूर,
इत्यादी
ठिकाणे आहेत,
प्रमुख
रस्ते
तेल्हारा
ते मंगरूळपीर मार्ग : तेल्हाऱ्याहून शेजारच्या वाशीम
जिल्ह्यातील मंगरूळपीरकडे हा मार्ग जातो. या मार्गावर अंदुरा,
अकोला,
बार्शीटाकळी,
महान
आदी ठिकाणे आहेत. अकोट- वाशीम मार्ग : या
मार्गावर पाटसूळ, चोहट्टा, अकोला,
पातूर
इत्यादी ठिकाणे आहेत. मूर्तिजापूरहून अमरावती जिल्ह्यातील अचलपूरकडे व
कारंजामार्गे यवतमाळकडे मार्ग जातात.
लोहमार्ग
जिल्ह्यात अकोला व मूर्तिजापूर ही
दोन महत्त्वाची रेल्वे जंक्शने आहेत. जिल्ह्यातील लोहमार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ
विभागात मोडतात.
1.
मुंबई - नागपूर - कोलकाता लोहमार्ग:
हा लोहमार्ग जिल्ह्यातून पश्चिमेकडून पूर्वेस जातो. या मार्गावर पारस,
अकोला,
बोरगाव
मंजू, काटेपूर्णा,
मूर्तिजापूर
आदी स्थानके आहेत.
2. खांडवा - पूर्णा लोहमार्ग :
हा
लोहमार्ग जिल्ह्यातून उत्तर-दक्षिण गेला आहे. या मार्गावर अकोट,
पाटसूळ,
अकोला,
बार्शीटाकळी
इत्यादी स्थानके असून हा मार्ग पुढे वाशीमहून हिंगोलीमार्गेपूर्णाकडे जातो.
सध्या
पुर्णा ते अकोला रेल्वेमार्ग ब्रॉडगेज झाला आहे. ग्यामार्गे अकोला-कुचीपूडी
(हॅद्राबाद ) आणि नागपूर्-कोल्हापूर रेल्वे सुरु आहेत. अकोला-खण्डवा मार्ग अजुनही
नॅरोगेज असून तो ब्रॉडगेज झाल्यास वर्हाड परीसराच्या विकासाला चालना मिळेल.