बिहार
बिहार उत्तर भारतातील राज्य आहे. बिहारच्या उत्तरेला नेपाळ हा देश, पश्चिमेला उत्तर प्रदेश, दक्षिणेस झारखंड तर पूर्वेला पश्चिम बंगाल ही राज्य आहेत. बिहारचे क्षेत्रफळ ९४,१६३
चौ.किमी एवढे आहे. याची लोकसंख्या २,७७,०४,२३६ एवढी आहे. साक्षरता ६३.८२ टक्के
आहे. हिंदी ही येथील प्रमुख भाषा आहे. तांदूळ, गहू व मका ही येथील प्रमुख पिके आहेत. बिहार राज्यात ३८ जिल्हे आहेत.
हरियाणा
हरियाणा हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख
व प्रगत राज्य आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची लोकसंख्या२,५३,५३,०८१
एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. चंदीगड ही हरियाणा व पंजाब या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे. हरियाणाचीसाक्षरता ७६.६४ टक्के आहे. गहू, ज्वारी, जव, ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. महाभारत काळात कौरव व पांडव यांच्यात हरियाणा येथील कुरुक्षेत्रया ठिकाणी भीषण युद्ध झाले होते.