डॉ. अघोरनाथ
चटोपाध्याय[
अघोरनाथ इ.स.१८७८
मध्ये हैदराबादेत आले. त्यांचा हैदराबाद संस्थानाच्या सामाजिक,
राजकीय व वैचारिक वर्तुळात राबता
होता. .डॉ. अघोरनाथ चटोपाध्याय यांनी हैदराबाद संस्थानातील राजकीय नेते,
लेखक, समाजसुधारक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना
एकत्र आणले. ते इ.स.१९०७ निजाम कॉलेज येथून निवृत्त झाले. त्यांचा देहान्त
इ.स.१९१५ मध्ये झाला. समाजाला दिलेले त्यांचे योगदान अद्वितीय होते.
केशवराव कोरटकर
परभणी जिल्ह्यातील वसमतयेथे १८६७ साली कोरटकरांचा जन्म झाला.
त्यांचे शिक्षण उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा येथे झाले. तेथेच त्यांनी वकिली केली.
त्यांचा त्या वेळच्या महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय नेत्यांशी परिचय होता.
महाराष्ट्रातील घडामोडींचा त्यांच्या मनावर ठसा होता. पुण्यातील वसंत व्याख्यान
माला व इतर कार्यक्रमास ते उपस्थित असत. १८९६ साली ते हैदराबादेस आले. डॉ. अघोरनाथ
चटोपाध्यायांप्रमाणेच केशवराव कोरटकर यांनी स्वतःला सामाजिक व राजकीय कार्यात
झोकून दिले.
भाऊराव भिमाजी पाटील मतसागर
सन १९२३ साली, औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील जरूळ या गावी श्री. भाऊराव भिमाजी मतसागर
यांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून
त्यांना वंचित रहावे लागले. तथापि प्रचंड जिज्ञासा व इच्छाशक्तीच्या जोरावर
त्यांनी मोडी लिपी आणि मराठीभाषेसह तेलुगू, गुजराती, ऊर्दू, इंग्रजी या इतर भाषादेखील स्वपरिश्रमाने
आत्मसात केल्या. त्याचबरोबर त्यांनी पौराणिक ग्रंथांचे विश्लेषण करून इतिहास
संशोधन केले.
हैद्राबाद
मुक्तिसंग्रामात भाऊराव भिमाजी पाटलांचे तसेच त्यांच्या कुटुबीयांचे योगदान व
त्यांनी उचललेले कष्ट विशेष उल्लेखनीय आहेत. आपल्या जरूळ येथील स्वतःच्या घरावर त्यांनी
भारताचातिरंगा फडकावल्यामुळे निजामी
राजवटीत रझाकारांनी त्यांचा व त्यांच्या
कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. त्यानंतरही लाठीहल्ल्यात जखमी होऊन बेशुद्ध
होईस्तोवर त्यांनी भारतीय ध्वज उतरविला नाही.
औरंगाबाद येथे केलेल्या सत्याग्रहामुळे श्री. माणिकचंद
पहाडे यांच्यावर रझाकार फारूकी यांनी अत्याचार केल्यामुळे
तेथे पुन्हा कुणीही सत्याग्रह करण्यास धजावत नव्हते. श्री. भाऊराव
भिमाजी मतसागर यांनी हे आव्हान स्वीकारून तेथील सिटीचौकात सत्याग्रह केला.
त्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला, तसेच फटक्यांची (टिकटिकीची) सजाही सुनावण्यात आली. परंतु
तुरुंगातील सर्व राजकीय कैद्यांनी या सजेविरूद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे ही सजा
मागे घेण्यात आली.
हैद्राबाद
मुक्तिसंग्राम संघर्षानंतर त्यांनी औरंगाबादेतील सामाजिक व राजकीय कार्यात भाग
घेतला. श्री. विनायकराव
पाटील यांच्या सोबत त्यांनी शिक्षण प्रसार
आणि सामाजिक सुधारणांच्या कामी स्वतःला वाहून घेतले. याची दखल घेऊन थोर समाज
सुधारक श्री. धोंडो
केशव कर्वे यांनी त्यांना पारितोषिकही प्रदान
केले होते. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती श्री. वि.
वि. गिरी यांनी त्यांची राष्ट्रपती भवनात भेट
घेऊन सामाजिक आणि शेतकऱ्य़ांच्या समस्यांवर त्यांच्याशी चर्चा केली,
तसेच तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा
गांधी यांनी त्यांना हैद्राबाद
मुक्तिसंग्रामातील भरीव योगदानाबद्दल त्यांनाताम्रपत्र बहाल केले.
कृषिक्षेत्रातही
श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांनी आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवून ओसाड
शेतजमिनीवर भरघोस उत्पादन घेऊन दाखविले. ह्या कामगिरीबद्दल त्यांना तत्कालीन राज्यपाल अली
यावर जंग यांनी १९७० साली शेतीनिष्ठ
शेतकरी या सन्मानाने पुरस्कृत केले. ह्या
कार्यक्रमानंतरच श्रीलंकेच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती सिरीमावो
भंडारनायके यांनी राजभवनात त्यांची भेट घेऊन
कृषिक्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
त्यांच्या इतर
शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांबद्दल माजी पंतप्रधान राजीव
गांधी, तसेच पी.
व्ही. नरसिंहराव यांनी त्यांना सोनेरी पदके देऊन
गौरविले होते. या थोर व्यक्तीचे सन १९९५ साली वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले.
·
मुल्ला अब्दुल कयुम खान
·
विजेंद्र काबरा
·
विनायकराव केशवराव कोरटकर
·
फुलचंद गांधी
·
देवीसिंग चव्हाण
·
शंकरराव चव्हाण
·
पी. व्ही. नरसिंहराव
·
भगवंतराव नाईक,[[हैदराबाद
मुक्तीसंग्राम लढ्यात सहभाग,सयुक्त महाराष्ट्र
चळवळीत ११ दिवस कारावास,इंदिरा बचाव
आंदोलनात आटक,कल्हाली
गावचे पहिले सरपंच,कंधार प.स.चे
पहिले सदस्य]]
·
वामन नाईक
·
गोविंदराव नानल
·
ताराबाई परांजपे
·
रमणभाई पारीख
·
रामचंद्र पिल्लई
·
मुकुंदराव पेडगांवकर
·
दिगंबरराव बिंदू
·
श्यामराव बोधनकर
·
अनंत भालेराव
·
डॉ. मेळकोटे
·
मोहिब हुसेन-मौलिम
ए शफिक पत्राचे संपादक
·
के.व्ही.रंगारेड्डी
·
बी.रामकृष्ण
राव
·
स्वामी रामानंद तीर्थ
·
गोविंदभाई श्रॉफ
·
बी. सत्यनारायण
रेड्डी
·
सय्यद अखिल- हाजार
दास्तानचे संपादक