चिंतामणराव
द्वारकानाथ देशमुख एक उत्कृष्ट प्रशासक व अर्थतज्ञ म्हणून ओळखले जातात. आय.सी. एस
(इंडियन सिव्हील सर्व्हिसेस ) परीक्षेत ते प्रथम आले. सी. डी. देशमुख हे भारतीय
रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर बनले. १९५० – ५७ या काळात भारताच्या नियोजन
मंडळाचे ते सभासद होते. इ. स. १९५० मध्ये भारत सरकारचे अर्थमंत्री म्हणून कार्यभार
भूषविला. परंतु १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांवरून त्यांनी आपल्या
अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. देशमुखांनी इ.स. १९६९ मध्ये भारताच्या राष्ट्रपती
निवडणूक लढविली. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांनी कालीदासांच्या
मेघदुत या काव्याचा मराठी अनुवाद केला. त्यांचे द कोर्स ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र
प्रसिध्द आहे.