१ नोव्हेंबर इ. स. १९५६ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात,मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतू बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतू या द्विभाषिकाचेमहाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. १९५७च्या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. इंदिरा गांधीने नेहरुंचे मन वळवले. द्वैभाषिकची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याला गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली.[२] तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं 'व्याज' म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली.[३] मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरुंना राज्याला हवे असलेले 'मुंबई' नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना कामगारदिनी म्हणजे १ मे रोजी केली गेली. महाराष्ट्रस्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.
हुतात्म्यांची नावे
२१ नोव्हेंबर इ.
स. १९५५ चे हुतात्मे
१] सिताराम बनाजी पवार
२] जोसेफ डेव्हिड पेजारकर
३] चिमणलाल डी. शेठ
४] भास्कर नारायण कामतेकर
५] रामचंद्र सेवाराम
६] शंकर खोटे
७] धर्माजी गंगाराम नागवेकर
८] रामचंद्र लक्ष्मण जाधव
९] के. जे. झेवियर
१०] पी. एस. जॉन
११] शरद जी. वाणी
१२] वेदीसिंग
१३] रामचंद्र भाटीया
१४] गंगाराम गुणाजी
१५] गजानन ऊर्फ बंडू गोखले
१६] निवृत्ती विठोबा मोरे
१७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
१८] बालप्पा मुतण्णा कामाठी
१९] धोंडू लक्ष्मण पारडूले
२०] भाऊ सखाराम कदम
२१] यशवंत बाबाजी भगत
२२] गोविंद बाबूराव जोगल
२३] पांडूरंग धोंडू धाडवे
२४] गोपाळ चिमाजी कोरडे
२५] पांडूरंग बाबाजी जाधव
२६] बाबू हरी दाते
२७] अनुप माहावीर
२८] विनायक पांचाळ
२९] सिताराम गणपत म्हादे
३०] सुभाष भिवा बोरकर
३१] गणपत रामा तानकर
३२] सिताराम गयादीन
३३] गोरखनाथ रावजी जगताप
३४] महमद अली
३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे
३६] देवाजी सखाराम पाटील
३७] शामलाल जेठानंद
३८] सदाशिव महादेव भोसले
३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे
४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर
४१] भिकाजी बाबू बांबरकर
४२] सखाराम श्रीपत ढमाले
४३] नरेंद्र नारायण प्रधान
४४] शंकर गोपाल कुष्टे
४५] दत्ताराम कृष्णा सावंत
४६] बबन बापू भरगुडे
४७] विष्णू सखाराम बने
४८] सिताराम धोंडू राडये
४९] तुकाराम धोंडू शिंदे
५०] विठ्ठल गंगाराम मोरे
५१] रामा लखन विंदा
५२] एडवीन आमब्रोझ साळवी
५३] बाबा महादू सावंत
५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर
५५] विठ्ठल दौलत साळुंखे
५६] रामनाथ पांडूरंग अमृते
५७] परशुराम अंबाजी देसाई
५८] घनश्याम बाबू कोलार
५९] धोंडू रामकृष्ण सुतार
६०] मुनीमजी बलदेव पांडे
६१] मारुती विठोबा म्हस्के
६२] भाऊ कोंडीबा भास्कर
६३] धोंडो राघो पुजारी
६४] ह्रुदयसिंग दारजेसिंग
६५] पांडू माहादू अवरीरकर
६६] शंकर विठोबा राणे
६७] विजयकुमार सदाशिव भडेकर
६८] कृष्णाजी गणू शिंदे
६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले
७०] धोंडू भागू जाधव
७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे
७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर
७३] करपैया किरमल देवेंद्र
७४] चुलाराम मुंबराज
७५] बालमोहन
७६] अनंता
७७] गंगाराम विष्णू गुरव
७८] रत्नु गोंदिवरे
७९] सय्यद कासम
८०] भिकाजी दाजी
८१] अनंत गोलतकर
८२] किसन वीरकर
८३] सुखलाल रामलाल बंसकर
८४] पांडूरंग विष्णू वाळके
८५] फुलवरी मगरु
८६] गुलाब कृष्णा खवळे
८७] बाबूराव देवदास पाटील
८८] लक्ष्मण नरहरी थोरात
८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
९०] गणपत रामा भुते
९१] मुनशी वझीऱअली
९२] दौलतराम मथुरादास
९३] विठ्ठल नारायण चव्हाण
९४] देवजी शिवन राठोड
९५] रावजीभाई डोसाभाई पटेल
९६] होरमसजी करसेटजी
९७] गिरधर हेमचंद लोहार
९८] सत्तू खंडू वाईकर
९९] गणपत श्रीधर जोशी
१००] माधव राजाराम तुरे(बेलदार)
१०१] मारुती बेन्नाळकर
१०२] मधूकर बापू बांदेकर
१०३] लक्ष्मण गोविंद गावडे
१०४] महादेव बारीगडी
१०५] कमलाबाई मोहिते
१०६] सिताराम दुलाजी घाडीगांवकर