गौंड जमातीतील उठाव
१८१७-१८ च्या काळात नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांनी गौंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध उठाव केला. बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला. भोसलेंनी रणजीतसिंहासह अनेक हिंदी संस्थानिकांचे मन वळवून इंग्रंजांच्या विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांना इंग्रजांकडून पराभव पत्करावा लागला. १८४० मध्ये भोसलेंचा जोधपुर येथे मृत्यू झाला. •
हटकरांचा उठाव
मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात हंसाजी नाईक हटकर यांचे
छोटेसे राज्य होते. नोव्हाचा किल्ला हंसाजीचा प्रमुख आधार होता. त्यावेळी मराठवाडा
हा इंग्रजांचा मांडलिक निजामच्या ताब्यात होता. हंसाजीने १८१९-२० मध्ये निजाम व
इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला. मेजर पिटसन, कॅप्टन
इव्हान्स डेविड, कॅप्टन मैडोज टेलर यांनी ४००० सैनिकांसह हंसाजीवर हल्ला
केला. इंग्रजांनी नोव्हा किल्ल्यावर तोफा डागून तो किल्ला ताब्यात घेतला. तेव्हा
हंसाजीने उमरखेड येथून इंग्रजांशी लढा दिला. इंग्रजांनी हंसाजी हटकर याचा पराभव
केला व त्याचे राज्य ताब्यात घेतले.