जम्मू
आणि काश्मीर हे
भारतातील सर्वात उत्तरेकडे असलेले राज्य आहे. या राज्याला भारताचा मुकुट असेसुद्धा म्हणतात. या राज्याच्या
पश्चिमेलापाकिस्तान तर
उत्तर व पूर्व दिशांना चीन हे देश आहेत, तर दक्षिणेला हिमाचल प्रदेश हे राज्य आहे. २,२२,२३६
चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या जम्मू-काश्मीरची लोकसंख्या १,२५,४८,९२६ एवढी आहे. काश्मिरी व उर्दू ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. राज्याची साक्षरता ६८.७४ टक्के आहे. तांदूळ,गहू व मका ही येथील प्रमुख पिके, सफरचंद हे प्रमुख फळ व पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. काश्मीरला भारताचे नंदनवन
म्हणतात.जम्मू आणि काश्मीर राज्यात १४ जिल्हे आहेत.
Labels:
भारताचा भूगोल