वि.स.
खांडेकर (१८९८ – १९७६)
वि.स. खांडेकर हे कादंबरीकर, कथाकार व
लघुनिबंधकार म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांच्या ययाती कादंबरीस साहित्य अकादमीचा
पुरस्कार व भारतीय ज्ञानपीठतर्फे १९७४ चे ज्ञानपीठ हे पारितोषिक मिळाले.
साहित्य – ययाती, हृदयाची हाक, कांचन
मृग, हिरवा चाफा, दोन मने, कौच वध, सुखाचा
शोध, पहिले प्रेम, पांढरे डाग, अमृत वेल
इ.
कथासंग्रह - कालची स्वप्ने, नवा प्राप्तःकाल, लघुनिबंध संग्रह – चांदण्यात, वायु लहरी, सायंकाळ, मझधार, झिमझिम कल्पकता इ.
आचार्य
प्र. के. अत्रे
प्रल्हाद केश अत्रे हे श्रेष्ठ विनोदी लेखक झुंझार पत्रकार, नाटककार, कुशल
वृत्तपत्र संपादक, यशस्वी चित्रपट निर्माते व
दिग्दर्शक होते. एक प्रभावी व विनोदी वक्ते म्हणून प्रसिध्द होते. केशव
कुमार या नावाने विडंबनात्मक कविता लिहिल्या. अग्रॅनी नवयुग हे साप्ताहिक व मराठा
(१५ नोव्हेंबर १९५६) हे दैनिक चालवले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रमुख नेते होते.
साहित्ये / नाटके- साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर, मोरूची
मावशी, तो मी नव्हेच, भ्रमाचा भोपळा, ब्रम्हचारी, डॉ. लागू
हश्या आणि टाळ्या हा विनोदी भाषणाचा संग्रह, झेंडूची
फुले (काव्यसंग्रह), मी कसा झालो (आत्मकथनपर ग्रथं ) व
क-हेचे पाणी (आत्मचरित्र).