भारत नदीप्रणाली - Scholarship Exam


हिमालयीन नद्या

हिमालयात उगम पावणा-या नद्या बारमाही स्वरुपाच्या आहेत.


)सिंधू नदी प्रणालीः-

हिचा उगम तिबेटमध्ये कैलास पर्वतावर सेंगेरुबाब येथील मानसरोवरातून होतो. हिची एकूण लांबी २९०० कि.मी. असून भागातून ७०९ कि.मी. वाहते. सतलज, बियास ( व्यास  ) रावी, चिनाब, झेलम या हिच्या प्रमुख उपनद्या आहेत. ही ५१८१ मी. खोल घळईतून वाहते. कराची जवळ अरबी समुद्रास मिळते.

·       लाहूल (हि.प्रदेश) येथे चंद्र भागा या दोन नद्यांच्या संगमातून तयार होणारी सर्वात मोठी उपनदी चिनाब

·       रावी चीनाब नद्यांचा संगम मुलतान जवळ (पाकिस्थान)

·       बियास नदी पंजाबच्या मैदानात प्रवेश करते मिरताल जवळ

·       बुलर सरोवरातून वाहणारी झंग (पाकिस्थान) येथे चिनाब नदीस मिळणारी नदी झेलम

·       सिंधू पाणी वाटप करानुसार भारतास मिळणारे पाणी २०%



)  गंगा नदी प्रणालीः-

गंगा नदी भागिरथी अलकनंदा यांच्या संगमातून उगम पावते. देव प्रयाग येथे हा संगम होतो. तेथून तिला गंगा म्हणतात. भागिरथी हा मुळ प्रवाह मानतात. तिचा उगम गोमुख (गंगोत्री, हिमनदी, उत्तराखंड) येथून होतो. गंगा नदी हरिद्वार येथे मैदानी प्रदेशात प्रवेश करते. गंगा ही नदी असून तिची लांबी २५१० कि.मी. इतकी आहे. ती हरिद्वार पासून मिर्झापूर पर्यंत आग्रेयेकडे नंतर पूर्वेकडे वळते. अलाहाबाद (प्रयाग) येथे यमुना येऊन मिळते. गंगेस उजवीकडून यमुना, शोण, दामोदर ह्या उपनद्या तर डावीकडून रामगंगा, गोमती, घाग्रा (शरयू) गंडक, कोसी या उपनद्या येऊन मिळतात.

·       गंगेची सर्वात मोठी उपनदी यमुना

·       गंगा भारतातील पाच राज्यांतून वाहते - उत्तराखंड, .प्रदेश, झारखंड, बिहार . बंगाल

·       दामोदर या हुगळीच्या उपनदीस बंगालचे दुःखाश्रु असे म्हणतात

·       गंगेची सर्वात मोठी दितरिका हुगळी



)  यमुना

ही नदी यमुनेत्री येथे उगम पावते, ताजेवाला येथे मैदानी भागात प्रवेश करते. विंध्य पर्वतातून उगम पावणा-या चंबळ, बेतवा, केन, सिंद या नद्या यमुनेला येऊन मिळतात. 

)   कोसी

कांचनगंगा (नेपाळ) येथे उगम पावते. सात छोट्या नद्यांच्या एकत्रीकरणातून तयार होते. छतरा येथे मैदानी भागात प्रवेश करते. हिच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. महापूर अचानक मार्ग बदलणे यासाठी ती प्रसिध्द आहे. गेल्या २०० वर्षात ती ११० कि.मी. पश्चिमेकडे सरकली आहे. सध्या ती कारागोलाजवळ गंगेस मिळते. तिच्या या रुपामुळे तिला बिहारचे दुःखाश्र असे म्हणतात.



) क्षिप्रा

क्षिप्रा नदीकाठी उज्जैन येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा होतो. (चंबळची उपनदी) 

)   घग्गर

हरीयाणात हनुमानगढ येथे लुप्त होते. 

)ब्रम्हपुत्रा नदी प्रणालीः-

ब्रम्हपुत्रा नदी तिबेटमधील कैलास पर्वतात मानसरोवर जवळ चोमायांग दुंम येथे उगम पावते. तिबेटमधुन त्सांगपो नावाने वाहते. नामचा बारवा येथून दक्षिणेला वळून भारतात अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते. दिहांग, दिबांग लोहीत या नद्यांच्या एकत्रित प्रवाहास ब्रम्हपुत्रा असे म्हणतात. गंगा ब्रम्हपुत्राच्या एकत्रित प्रवाहास पद्मा असे म्हणतात. गंगा ब्रम्हपुत्रेचा संगम ग्वालंदेजवळ होतो. गंगा ब्रम्हपुत्रेच्या वितरिका मधुमती, पद्मा, सरस्वती, हुगळी भागिरथी ब्रम्हपुत्रेस मोठ्या प्रमाणावर येणा-या पुरामुळे तिला आसामचे अश्रू असे म्हणतात. तर जलवाहतुकीस उपयुक्त असल्यामुळे आसामची जीवनरेषा असे म्हणतात. 

पठारावरील नद्या

)  बंगालच्या उपसागरास मिळणा-या नद्याः-

)  गोदावरी - ही पठारावरील सर्वांत मोठी भारतातील द्वितीय क्रमांकाची नदी आहे. हिला दक्षिण भारताची गंगा किंवा वृध्द गंगा असेही म्हणतात. हिचा उगम त्रंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वतावर होतो. महाराष्ट्रात ती आंध्रप्रदेशमध्ये प्रवेश करते.

)   कृष्णा - हिचा उगम महाबळेश्वर येथे होतो. पुढे कर्नाटकात प्रवेश करते. आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे तिच्या अनेक शाखा होतात. भारतातील एकुण लांबी १२९० कि.मी. आहे.

)  कावेरी - कर्नाटक मधील कुग जिल्ह्यात ब्रम्हगिरी येथे उगम पावते.कर्नाटक तामिळणाडू या राज्यातून ६७० कि.मी. वाहत जाउन कावरीपट्टनम जवळ बंगालच्या उपसागरास मिळते. शिव समुद्र जवळ ११० मी. चा धबधबा आहे. या नदीत शिवसमुद्र श्रीरंगपट्ट्नम ही दोन बेटे आहेत.

)   महानदी - हिचा उगम छत्तीसगढ राज्यात अमरकंटक रागांत बस्तर टेकड्यांवर होतो. हि ओरिसातील सर्वांत मोठी नदी आहे. ८९० कि.मी. प्रवास करुन कटक जवळ बंगालच्या उपसागरास मिळते.



)  अरबी समुद्रास  मिळणा-या नद्याः-

)  लुनी - अरवली पर्वतात नाग डोंगरावर उगम पावून कच्छच्या रनास मिळते. हि वाळवंटातून लुप्त होते.

)   मही - मध्यप्रदेशातील विंध्य पर्वतावर उगम पावते. ५३३ कि.मी. अंतरपार करुन खंबयतच्या आखातास मिळते.

)  साबरमती - राजस्थानच्या डूंगरपूर जिल्ह्यातील अरवली प्रर्वतात उगम पावून ३०० कि.मी. प्रवास करुन खंबायतच्या आखातास मिळते.

)   नर्मदा - छत्तीसगढ राज्यात अमरकंटक पठारावर मैकल पर्वतरांगेत उगम पावते. पश्चिमेकडे वाहत जाऊन ती भडोच जवळ अरबी समुद्राला खंबायतच्या आखाताला जाऊन मिळते.  प्रवाह मार्गात जबलपूरजवळ ती भेडाघाट येथे धुवाँधार धबधबा निर्माण करते. संगमवरी दगडांतून कपिल धारा धबधबा  निर्माण करते. महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातून ५४ कि.मी. वाहते. ती खचदरीतून प्रवास करते. एकूण लांबी १२९० कि.मी. आहे.

)   तापी - तापीचा उगम मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यात महादेव डोंगररांगात मुलताई येथे उगम पावते. उत्तरेकडील सातपुडा दक्षिणेकडील सातमाळा अजिंठा रांगातून वाहते. ही महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करते.  महाराष्ट्रात २१० कि.मी. वाहून नंदुरबारमधून गुजरात  मध्ये प्रवेश करते. ७२४ कि.मी.चा प्रवास करून सुरतजवळ खंबायतच्या आखातास मिळते.

) पेरियार - ही तामिळनाडू उगम पाऊन केरळमध्ये जाते. पेरियार ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे.

इतर महत्वाची माहिती

·       सोन नदीची प्रमुख उपनदी - रिहांद

·       अरवली पर्वताचे विभाजन करणारी नदी - बनास.

·       पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक - क्यूसेक (घनफुट प्रती सेकंद), क्यूमेक (घनमीटर प्रतीसेकंद)

·       भारतातील सर्वांत मोठा धबधबा शरावती नदीवर आहे - गिरसप्पा/जोग/महात्मा गांधी धबधबा - २५३ मी. (कर्नाटक) 

नदी

प्रमुख उपनद्या

सिंधू

रावी, बियास, चिनाब, सतलज, झेलम

गंगा

यमुना, शोण, दामोदर, घाग्रा, रमगंगा, गोमती, गंडक, कोसी, शारदा, राप्ती

यमुना

चंबळ, बेतवा, केन, सिंद, बाणगंगा

चंबळ

सिंधू, पार्वती, बनास, काळी सिंधू, क्षिप्रा

ब्रम्हपुत्रा

दिहांग, दिवांग, लोहित, मानस, घनसिरी, कापिली, तिस्ता, जयभोरेली

गोदावरी

वैनगंगा, इंद्रावती, मांजरा, प्रवरा, कादवा, सिंदफणा, पूर्णा, वर्धा

कृष्णा

कोयना, येरळा, दूधागंगा, मलप्रभा, भिमा, तुंगभद्रा, घटप्रभा, मुसी, पंचगंगा

नर्मदा

डावीकडून - -हनेर, बंजार, शार, शक्कर, दुधी तवा

उजवीकडून - हिरण, आरसांग, बारणा कोलार

तापी

पूर्णा, पांझरा, गिरणा, अनेर, बोरी, नळगंगा, चंद्रभागा, काटेपूर्णा

 

 

नदी

काठावरील शहरे

नदी

काठावरील शहरे

गंगा

हरिद्वार, कानपूर, मुंगे, मुर्शिदाबाद, बनारस (वाराणसी) पाटना

चंबळ

कोटा

तापी

सुरत

कावेरी

तिरुचिरापल्ली, श्रीरंगपट्टनम

ब्रम्हपुत्रा

दिब्रूगड, गुवाहाटी

यमुना

दिल्ली, आग्रा, मथुरा, इटावा

झेलम

श्रीनगर

शरयू (घाग्रा)

अयोध्या

सतलज

फिरोरपूर, लुधियाना

हुगळी

कोलकाता

कृष्णा

विजयवाडा

गोमती

लखनौ

गोदावरी

नाशिक, राजमहेंद्री, नांदेड

साबरमती

अहमदनगर

अलकनंदा

उत्तरकाशी

महानदी

कटक

मुशी

हैद्राबाद

क्षिप्रा

इंदोर

मांडवी

पणजी

तावी

जम्मू

नर्मदा

भरुच

तुंगभद्रा

कर्नुल

भारतातील प्रमुख नद्यांची माहिती

नदी

उगम

लांबी (कि.मी)

मिळते

सिंधू

कैलास पर्वतात मानसरोवर जवळ (तिबेट)

२९००/७०९ (भारत)

अरबी समुद्र

झेलम

वैरीनाग (पीरपंजाल)

४००

सिंधू (पाकिस्थान)

रावी

कुलू टेकड्या, रोहतांग खिंड (हिमाचल प्रदेश)

७२५

सिंधू (पाकिस्थान)

बियास

बियास कुंड (हिमाचल प्रदेश)

४७०

सतलज नदी

चिनाब

लाहुल (बारा लापचा खिंड, हिमाचल प्रदेश)

१८००/११८०

सिंधू (पाकिस्थान)

सतलज

राकस सरोवर (तिबेट)

१५००/१०५०

सिंधू (पाकिस्थान)

ब्रम्हपुत्रा

मानसरोवर, चोमायांग दुंम हिमनदी (तिबेट)

२९००/८८५

बंगालचा उपसागर

गंगा

गंगोती (उत्तराखंड)

२५१०

बंगालचा उपसागर

यमुना

यमुनेत्री (बंदरपु्छ)

१३००

गंगा (अलाहाबाद)

घाग्रा (शरयू)

मापचाचुंग हिमनदी (तिबेट)

१०८०

गंगा (छपरा) बिहार

कोसी

कांचनजंगा पर्वत

७३०

गंगा (कारागोला)

गंडक (नारायणी-नेपाळ)

धवलगिरी (मध्य हिमालय)

४२५

गंगा (पटना)

रामगंगा

बृहद हिमालय (गढवाल)

६००

गंगा (कनोज)

शारदा (काळी गंगा)

मिलाप हिमनदी

 

घाग्रा (बहरामघाट)

राप्ती

रुकुम कोट (नेपाळ)

६५०

घाग्रा (बरहज)

गोमती

पिलीभीत ( . प्रदेश)

 

गंगा (गाजिपूर)

चंबळ

महू (. प्रदेश)

९५०

यमुना

बेतवा

कुमरा (. प्रदेश) विंध्य पर्वत

४७५

यमुना

सिंध

सिरोज (गुना - मध्य प्रदेश)

 

चंबळ ( .प्रदेश)

काली सिंध

देवास (.प्रदेश)

 

चंबळ ( .प्रदेश)

केन

विंध्य पर्वत

 

यमुना( .प्रदेश)

क्षिप्रा

काक्री बरडी डोंगर (इंदोर)

 

चंबळ

बाणगंगा

बैरट दोम्गर (जयपूर)

 

यमुना (फतेबाद)

बनास

कुंभगढ (खमनौर डोंगर)

४७५

चंबळ

सोन

अमरकंटक (विंध्य)

७७५

गंगा (रामनगर-पटना)

गोदावरी

ब्रम्हगिरी (त्रंबकेश्वर-नाशिक)

१४५०

बंगालचा उपसागर

कृष्णा

महाबळेश्वर

१२९०/२८०

बंगालचा उपसागर

कावेरी

ब्रम्हगिरी (कुर्ग, कर्नाटक)

७६०

बंगालचा उपसागर

महानदी

अमरकंटक (छत्तीसगढ)

८९०

बंगालचा उपसागर

पेन्नार

कोलार (कर्नाटक)

९७०

बंगालचा उपसागर

तुंगभद्रा

ग्म्गामुळ काडूर (कर्नाटक)

६४०

कृष्णा

नर्मदा

अमरकंटक (छत्तीसगढ)

१२९०

अरबी समुद्र

तापी

मुलताई (बैतूल)

७२४

अरबी समुद्र

बराक

गोमुंडा टेकड्या (उदयपूर)

१९०

बनास नदी

तवा

महादेव डोंगर (. प्रदेश)

 

नर्मदा

मणिपूर

मणिपूर राज्य

 

 

इंद्रावती

कालाहारी प्रांत (ओरिसा)

 

गोदावरी (आंध्र प्रदेश)

भिमा

भिमाशंकर

४५१

कृष्णा (रायपूर)

साबरमती

जयसमुद्र सरोवर (उदयपूर-राजस्थान)

४००

खंबायतचे आखात

दामोदर

तोरी (छोटा नागपूर)

१३६६

हुळबी

 

इतर महत्वाची माहिती

धबधबा

उंची (मी)

नदी

राज्य

गिरसप्पा धबधबा (जोग)

२५३

शराबती

कर्नाटक

शिवसमुद्र

९०

कावेरी

कर्नाटक

धुवाँधार

१५

नर्मदा

मध्यप्रदेश

चुलिया

२०

चंबळ

कोटा ( राजस्थान )

वेण्णा

१८०

वेण्णा

महाबळेश्वर

 

सरोवरे :-

·       हिमनदीद्वारा निर्मित सरोवरे - नैनिताल, भिमताल, राकसताल .

·       उल्कापातातून तयार झालेले सरोवर - लोणार (बुलढाणा-महाराष्ट्र) खारे

·       भूमंच विवर्तनाने निर्मित सरोवर - बुलर (सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर - काश्मिर)

·       कायले (लंगून) - ओरिसातील चिल्का हे सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर आहे. पुलीकत (आंध्रप्रदेश), बेंबनाद, इष्ठमुदी (क्विनान - केरळ)

·       वायुद्वारा निर्मित सरोवर - डिडवाना सांबर (राजस्थान)

·       गोड्या पाण्याची सरोवरे - वुलर, दाल, शेषनाग, अनंतनाग, गंधारवाल, नागिन (जम्मू काश्मिर), हुसेनसागर (आंध्रप्रदेश) नैनिताल (उत्तराखंड), पुष्कर (राजस्थान)

·       खा-या पाण्याची सरोवरे - चिल्का (पुरी ओरिसा) पुलीकत (आंध्रप्रदेश)  बेंबनाद, इष्ठमुदी (केरळ) सांबर (राजस्थान) लोणार (बुलढाणा) दीडवाणा, मेंढा, खंडेल, हरियाणा (राजस्थान)

·       इतर - उदय सागर, पुछौला, फतेहसागर, जयसमुद्र, राजसमुद्र (राजस्थान), लोकटक (मणिपूर), हुसेनसागर (आंध्रप्रदेश)