स्वामी रामानंदतीर्थ - Scholarship Exam

   स्वामी रामानंदतीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भवानराव खेडगीकर) (ऑक्टोबर ३, १९०३ - ?) हे संन्यासी  हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे मराठी चळवळकर्ते होते. रामानंदतीर्थ यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापुर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंदतीर्थ झाले. त्यांचे मराठीवरचे प्रेम अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या नूतनीकरनात दिसून येते. या शाळेचे मराठी विद्यार्थ्यांना मराठी शिकता यावे यासाठी सुरुवात केली.