मानवनिर्मित आश्चर्ये
* इजिप्त मधील पिरॅमिड -
इसवी पूर्व २७०० ते २५०० पाहिले
इजिप्तच्या प्राचीन राज्यांनी फॅरो अनेक थडगी पिरॅमिट्स नाईल नदीच्या काठी आहेत. त्यापैकी कैरोजवळ
नाईलच्या पश्चिम तीरावरील गिझा येथे प्रचंड पिरॅमिड आहेत. यातील सर्वात
मोठा पिरॅमिड खुफूचा पिरॅमिड आहे. त्याने १३ एकर जागा
व्यापली आहे.
* बॅबिलॉन इराक येथील तरंगता बगीचा -
प्राचीन मॅसोपोटोमियाचा खाल्डिन राजा दुसरा
नेबूचाडनेझार याने आपल्या राजवाड्याच्या ४०० बाय ४०० फूट मापाच्या चौरस
गच्चीवर तरंगता व झुलता बगीचा बांधला तो ७५ फूट उंचीवर होता.
* अलेक्झांड्रिया बंदराजवळील दीपगृह -
राजा दुसरा टॉलेमी यांनी फॅरोस बेटावर हे
संगमररी दीपगृह बांधले. याची उंची १२२ मीटर होती. आज हे दीपगृह
अस्तित्वात नाही कारण ते भूकंपामुळे नष्ट झाले.
* ऱ्होड्स बेटावरील प्रचंड पुतळा -
भूमध्य समुद्रातील ऱ्होड्स नावाच्या एक ग्रीक
बेटावरील अपोलो या ग्रीक सूर्यदेवाचा ब्राँझ धातूचा पुतळा चेरेस या शिल्पकाराने
बनविला होता.
* इफेसस -
आजच्या तुर्कस्तानातील अर्टेमिस या ग्रीक
देवीचे भव्य मंदिर आर्टेमिस किंवा डायना देवीचे भव्य संगमवारी मंदिर आहे. सुमारे १८ मी उंच व छप्पर
लाकडी होते.
* हेलीकर्णासस -
तुर्कस्तान येथील भव्य कबर - प्राचीन आशिया
मायनरमधील कारियाचा राजा मॉसेलस याच्या मृत्यूनंतर त्याची राणी आर्टेमिसिया हिने
राजाची ही भव्य कबर खोदली.
* झ्यूस -
प्राचीन ग्रीसमधील ऑलम्पिया येथील झ्यूस या
ग्रीक देवाचा सिंहासनावर बसलेला सुमारे ४० फूट उंचीचा हा
पुतळा फिडियस या शिल्पकाराने बनविला आहे. सोने व हस्तिदंत
या पुतळ्यात समाविष्ट आहे.
* चीनची भिंत -
शी हवांग टी या चिनी सम्राटाने मंगोल
आक्रमणापासून चीनचे रक्षण व्हावे म्हणून बांधलेली २४१५
किमीची जगातील सर्वात लांब भिंत.
उंची सुमारे २२ फूट, जाडी सुमारे २०
फूट.
* स्टोन हेंज -
सॅलिबरी मैदान येथील प्राचीन अनेक टन
वजनाच्या शिळांची वर्तुळाकृती रचना.
* कलोसियम -
प्राचीन रोममधील भव्य खुले प्रेक्षागार व रंगमंच. यात सुमारे ४५,०००
प्रेक्षकांची बसण्याची व ५००० प्रेक्षकांची उभे राहण्याची सोय होती. सम्राट टायसन
यांनी हे बांधकाम केले होते.
* स्फिक्स -
ईजिप्तमधील गिझा येथील पिरॅमिडसमोरील मानवी
शीर्ष व सिंहाचे शरीर असलेला आणि एकाच सलग पाषणातून कोरलेला १६० फूट लांब व ७० फूट उंच
पुतळा.
* नानकिंग मनोरा -
चीनच्या इतिहासातील राजधानी नानकिंग येथे
असलेला हा मनोरा चिनी मातीचा आहे.
* पिसाचा झुकता मनोरा -
इटलीतील पिसा येथे हा सुप्रसिद्ध मनोरा जो
बांधकाम करत असताना काही दोषामुळे कलू लागला तर त्याचा तोल साधत त्याचे बांधकाम सुरू ठेवले. त्यामुळे हा
झुकता बनला.
* अंगकोर मंदिर -
कंबोडियातील मंदिर पहिला
धरणीद्रवर्मन व दुसरा सूर्यववर्मन यांच्या कारकिर्दीत विष्णूचे भव्य मंदिर.
* ताजमहाल -
मोघल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज
हिच्या स्मुर्तीप्रित्यर्थ ही वास्तू बांधली. आग्रा येथे
यमुना नदीच्या ठिकाणी संपूर्ण पांढऱ्या संगमवरी दगडात बांधली आहे.
* श्वेन डेगॉन पॅगोडा -
म्यानमारची राजधानी यांगोनजवळील ही वस्तू
म्हणजे बौद्ध मंदिर आहे. ९८ मीटर उंचीचे असून ते सोन्याचे मढवलेले
आहे.
व या मंदिरात
भगवान बुद्धाचे आठ केस जतुन ठेवले आहे.
* भूमिगत कब्रस्तान -
इटलीच्या रोम शहरात हे आरंभीच्या ख्रिस्ती
धर्मियांचे कबरस्थान आहे.
* हॅगिया सोफिया चर्च -
रोमन सम्राट काँस्टंन्तीन याने हे चर्च
बांधले हे भव्य चर्च तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे आहे. भव्य घुमट हे या
वास्तूचे वैशिष्ट्य आहे.
* अल्हाम्ब्रा राजवाडा -
अरबांनी स्पेनमधील आपल्या वर्चस्वाच्या काळात
ग्रानाडा येथे अल अहमद या मूर सुलतानाने हा किल्लासदृश्य राजवाडा बांधला.
निसर्गनिर्मित आश्चर्ये
* ग्रॅन्ड कॅन्यन -
अमेरिकेतील ऍरिझोना राज्यात ग्रॅन्ड कॅन्यन
ही जगातील सर्वात लांब घळई आहे. ही घळई ४६६
किमी लांब, १८३ मिटर, २९ किमी रुंद व
१.६ किमी खोल आहे, या घळईतून
कोलोरॅडो नदी वाहत जाते.
* सहारा वाळवंट -
सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठ वाळवंट
आहे. ते आफ्रिकेच्या उत्तर भागात आहे. त्याचा विस्तार
जवळपास भूमध्य समुद्र व ऍटलास पर्वत ते दक्षिणेस चाड सरोवरापर्यंत आहे. २२५० किमी व ५००० किमी त्याचा विस्तार आहे. पृथ्वीवरील
सर्वात जास्त प्रकाश मिळवणारा असा हा प्रदेश आहे.
* माउंट एव्हरेस्ट -
हे जगातील सर्वात मोठे उंच पर्वत शिखर ते
नेपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर हिमालय पर्वतरांगेत आहे. सर्वे ऑफ
इंडियानुसार याशिखराची उंची २९००२ फूट एवढी मोजून, हे जगातील
सर्वोच असल्याने जाहीर केले.
[ ८८४८ मीटर ] ठरवली आहे. सगरमाथा म्हणजे
स्वर्गातील सर्वोच बिंदू हे याचे भरतीय नाव आहे.
* सारावाह चेंबर -
सरावाक चेम्बर ही जगातील सर्वात मोठी भूयारी
गुन्हा असून ती मलेशियातील सरावाक प्रांतात आहे.
या गुहेचा शोध
१९८० मध्ये लागला.
* ग्रेट बॅरिअर रिफ -
ग्रेट बॅरिअर रिफ ही ऑस्ट्रेलियातील ईशान्य
किनाऱ्याजवळ असणारी पॅसिफिक महासागरातील प्रवाळद्वीपाची मोठी रांग माळ आहे. ही रंग २०२७ किमी पर्यंत
पसरली आहे. या बेटावरील सूक्ष्मजीवांना पॉलीप म्हणतात.
* मौना लोआ -
मौना लोआ म्हणजे हा जगातील सर्वात मोठा जागृत
ज्वालामुखी आहे. तो पॅसिफिक महासागरातील हवाई बेटात आहे. याची उंची ४१७० मीटर असून
ज्वालामुखीचा विस्तार १० चौरस किमी व खोली १८० मीटर आहे.
* एन्जल धबधबा -
हा जगातील सर्वात उंच धबधबा असून तो दक्षिण
अमेरिकेतील व्हेनेझुएला देशातील गयाना उच्च प्रदेशात डोंगराळ भागात आहे. त्याची उंची ९७९ मीटर आहे.
जग प्रमुख शहरे व त्यांची माहिती
* आबादान - बंदर, खनिज तेलाचे शुद्धीकरण केंद्र.
* इझमिर - बंदर, अंजीर, तंबाखू, कापूस, शालींची निर्यात.
* इस्तंबूल - इतिहासप्रसिद्ध शहर, व मोक्याचे बंदर, हजिया सोफिया, प्राचीन चर्च, निळी मशीद.
* इस्लामाबाद - सुप्रसिद्ध फैझल मशीद
* एडन - बंदर व नाविक दृष्ट्या महत्व
* ओसाका - बंदर, जपानचे व्हेनिस. टोकियो ओसाका मधील प्रसिद्ध बुलेट ट्रेन.
* कँडी - भगवान बुद्धाचा दात जतन केलेले, जवळ ५७ हेक्टर विस्ताराचे आकर्षक वनस्पती उद्यान.
* काठमांडू - पशुपतीनाथ मंदिर
* क्वालालंपूर - पेट्रोनॉस टॉवर, टेलिकॉम टॉवर.
* क्योटो - जपानची प्राचीन राजधानी, बौद्ध व शिंटो धर्म, व जपानी कला यांचे केंद्र, विद्यापीठ.
* जेरुसलेम - ज्यू, मुसलमान, व ख्रिश्चन लोकांचे पवित्र शहर, ज्यूंची वेलिंग वोल, डेव्हिडचे शहर.
* तक्षशिला - प्राचीन बौद्ध विद्यापीठाचे स्थान
* नागासाकी - बंदर, व जगाच्या इतिहासातील दुसरा अणवस्त्र हल्ला झालेले शहर.
* पेगू - पॅगोडासाठी प्रसिद्ध, श्वेमावडॉव, हा सुप्रसिद्ध पॅगोडा.
* बंदर अब्बास - बंदर, लोकर व खजूर यांची निर्यात.
* बांडुंग - अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद, व्यापारी वाहतूक.
* बेथलहेम - येशू ख्रिस्ताचे जन्मस्थान.
* बीजिंग - चीनचे शैक्षणिक व संस्कृतीक शहर, ग्रेट वॉल, समर पॅलेस, इंपिरियल पॅलेस.
* बोगोर - उत्कृष्ट वनस्पती उद्यान
* बोरोबुदूर - जगप्रसिद्ध बुद्धाचे मंदिर.
* मंडाले - लोकमान्य टिळकांना बंदिवासात ठेवले ते शहर,
* मक्का - मुसलमानांचे सर्वात पवित्र शहर, प्रेषित महंमद यांचे जन्मस्थान व पवित्र काबा ग्रॅन्ड
मॉस्क.
* मदिना - मुसलमानांचे पवित्र शहर व महमंद यांची कबर.
* यांगोन - महाविजय पॅगोडा, श्वेत पॅगोडा, म्यानमार मधील सर्वात मोठा पॅगोडा.
* लाहोर - लोलीवूड - पाकीस्तान चित्रपट उद्योगाचे शहर.
* ल्हासा - तिबेटचे प्रमुख शहर, व पोताला राजवाडा.
* लॉपनॉर - चीनचे अग्निबाण स्थळ
* शांघाई - चीनचे सर्वात मोठे शहर, बंदर.
* शानझेन - भव्य वस्तूंचा हुबेहूब विंडो ऑफ द वर्ल्ड हे भव्य
प्रदर्शन. १०० मीटर उंचीचा जगाचा नकाशा.
* शाओलीन - कुंग फु या युद्ध विद्येचे जन्मस्थळ.
* सिंगापूर - आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, व जगातील प्रमुख पर्यटन केंद्र.
* हॉंगकाँग - आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र.
* हिरोशिमा - जगाच्या इतिहासातील पहिला अणुबॉम्ब टाकला गेला ते शहर.
* हेरात - व्यापारी केंद्र व गालिच्यासाठी प्रसिद्ध.
* एडिस अबाबा - पादत्राणे व वस्त्रोद्योग
* अलेकझान्ड्रीया - भूमध्य समुद्रवरील बंदर, सम्राट अलेकझंडार यांनी स्थापन केलेले शहर.
* एण्टेबी - विषुवृत्तावरचे शहर, युगांडाचे व्यापार केंद्र.
* कैरो - इस्लामधर्माचे विद्याकेंद्र
* जोहानीसबर्ग - सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध शहर.
* हरारे - सोन्याच्या खाणी.
* किंबर्ली - हिऱ्यांच्या खाणी.
* पर्थ - सुंदर शहर.
* मेलबर्न - उत्तम बंदर, आर्थिक केंद्र.
* सिडनी - सिडनी ऑपेरा हाऊस, मेरीटाईम म्युझिअम.
* ख्राईस्टचर्च - फुलपाखरासाठी प्रसिद्ध शहर.
* वेलिंग्टन - मोटारी यांचे उत्पादन.
* केप केनेडी - अवकाशयान केंद्र.
* डॅलस - राष्ट्राध्यक्ष कॅनेडी यांची हत्या झाली.
* डेट्रॉईट - मोटारीचे प्रसिद्ध व्यापार व उत्पादन केंद्र.
* न्यूयॉर्क - अमेरिकेचे व जागतिक वित्तीय केंद्र, उंच इमारतींचे शहर, पर्यटन केंद्र.
* फिलाडेल्फिया - कँटिनटिनोपॉल येथे पहिली काँग्रेस हॉल येथे परिषद
घेतली.
* बोस्टन - बंदर, बोस्टन टी पार्टी येथे वसाहतवादी एक्तत्र जमले होते.
* लॉस एंजिलिस - हॉलिवूड चित्रनगरी, जगप्रसिद्ध डिझनी लँड.
* शिकागो - ११० मजली सिअर्स टॉवर, द विंड सिटी.
* वॉशिंग्टन डीसी - अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवास्थान व्हाईट हाऊस.
* सॅन्टा क्लारा - ख्रिस्त जन्मकथा सांगणारी इतिहासकालीन बेथहेमची
प्रतिकृती असलेली प्रतिनगरी.
* सॅन फ्रान्सिस्को - गोल्डन गेट ब्रिज, उद्योग केंद्र.
* ओटावा - कागद उद्योग.
* बोगोटा - खाजगी कार्सऐवजी सायकली बसगाड्या यांना प्राधान्य
देणारे शहर.
* आटवर्प - हिऱ्यांची बाजारपेठ.
* ऍमस्टरडॅम - बंदर, अँन फ्रॅंकचा पुतळा. जगातील सर्वात मोठे फुलांचे लिलाव केंद्र. सायकल नगरी, फुलांचा बाजार.
* ऑक्सफर्ड - विद्यापीठ
* कोर्सिका बेट - नेपोलियन बोनापार्ट यांचे जन्मस्थान.
* इटन - उच्च दर्जाचे पब्लिक स्कुल.
* ग्रिनिच - रेखांश स्थान जागतिक प्रमाण वेळ स्थान.
* जिनिव्हा - आंतरराष्ट्रीय परिषदांचे शहर.
* हेग - जागतिक न्यायालय.
* पॅरिस - एफेल टॉवर, जगप्रसिद्ध लूव्र म्युझिअम. आंतरराष्ट्रीय फॅशन केंद्र.
* प्राग - मोझार्ट म्युझियम, गरम पाण्याचे झरे.
* पिसा - झुकता मनोरा.
* बर्न - अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे निवास्थान.
* ब्रसेल्स - युरोपीय इकॉनॉमिक कम्युनिटी व नॅटो संघटना यांचे केंद्र.
* मँचेस्टर - वस्त्रोद्योग शहर.
* मॉस्को - जगातील सर्वात मोठे ग्रंथालय, जगप्रसिद्ध मेट्रो रेल्वे.
* लंडन - बॅकिंगहम पॅलेस, जगातील सर्वात सुंदर शहर.
* वॅटिकन सिटी - पॉप यांचे सत्तेचे केंद्र.
* विम्ब्लडन - अंतरराष्ट्रीय टेनिस सामन्यांचे ठिकाण.
* सेंटपीटरबर्ग्स - हर्मिटेज या जगप्रसिद्ध आर्ट म्युझियमचे ठिकाण.
* हानोवर - ग्रीन मेट्रोपोलीस, हरित महानगर.