मणिपूर & मेघालय - Scholarship Exam

 

मणिपूर

मणिपूर (मणिपुरी लिपीत: মণিপুর) हे भारत देशेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. मणिपूरच्या उत्तरेस नागालँड, दक्षिणेस मिझोराम,पश्चिमेस आसाम ही राज्ये तर पूर्वेस म्यानमार हा देश आहे. इंफाळ ही मणिपूरची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे. मणिपूर राज्याचे क्षेत्रफळ २२,३२७ चौ.किमी. एवढे आहे; लोकसंख्या २७,२१,७५६ एवढी आहे. मणिपुरी ही येथील प्रमुख भाषा आहे. मणिपूरचीसाक्षरता ७९.८५ टक्के आहे. तांदूळ, मोहरी  ऊस येथील प्रमुख पिके आहेत.

 

मेघालय

मेघालय हे भारत देशाचे एक राज्य आहे. मेघालय भारताच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या उत्तर व पूर्वेस आसाम राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे. शिलाँग ही मेघालयची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९७२ साली मेघालय राज्य आसामपासून वेगळे केले गेले. २०११ साली मेघालयची लोकसंख्या सुमारे ३० लाख होती. बहुसंख्य ख्रिश्चन धर्मीय रहिवासी असलेल्या केवळ तीन राज्यांपैकी मेघालय असून इंग्लिश ही येथील राजकीय भाषा आहे.

मेघालय भारतामधील सर्वाधिक वर्षाव होणारे राज्य असून येथे दरवर्षी सरासरी १२,००० मिलीमीटर (४७० इंच) इतका पाऊस पडतो. येथीलचेरापुंजी हे गाव जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे स्थान मानले जाते. मेघालयची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून असून येथील ८० टक्के जनता शेतीवर गुजराण करते.

येथील डोंगराळ भागामुळे मेघालयमध्ये पायाभुत सुविधा पूर्णपणे विकसित होऊ शकल्या नाहीत ज्यामुळे ह्या राज्याची अर्थव्यवस्था उर्वरित भारताच्या तुलनेत मागासलेली राहिली आहे.