गुरू
गुरू (Jupiter)
सूर्यापासून पाचव्या स्थानावर असलेला
सूर्यमालेमधील आकाराने सर्वांत मोठा ग्रह आहे. सूर्याचे वस्तुमान गुरूच्या १००० पट
असले तरीही इतर सर्व ग्रहांच्या एकूण वस्तुमानाच्या अडीच पट वस्तुमान केवळ एकट्या
गुरूचे आहे. गुरू, शनी, युरेनस आणिनेपच्यून यांचे वर्गीकरण राक्षसी वायू
ग्रह म्हणून केले जाते. या चार ग्रहांना
"जोवियन प्लॅनेट्स" ( jovian planets) असेसुद्धा म्हटले जाते.
प्राचीन काळापासून खगोलशास्त्रज्ञांना
गुरू माहीत होता. अनेक संस्कृतींच्या पौराणिक व धार्मिक कथांमध्ये गुरूचा उल्लेख
आढळतो. प्राचीन रोमवासीयांनी रोमन देव ज्युपिटर याच्यावरून या ग्रहालाज्युपिटर हे नाव दिले होते. पृथ्वीवरून बघितले
असता गुरूची दृश्यप्रत (apparent magnitude) −२.८ पर्यंत पोहोचू शकते. तेव्हा गुरू
हाचंद्र व शुक्रानंतरचा आकाशातील सर्वाधिक प्रकाशमान ग्रह
बनतो. (परंतु मंगळाची तेजस्विता त्याच्या कक्षाभ्रमणाच्या काही काळासाठी
गुरूपेक्षा जास्त होते).
गुरू ग्रह हा मुख्यत्वेकरून हायड्रोजन व थोड्या प्रमाणात हेलियमचाबनला आहे. त्याला इतर जड
मूलद्रव्यांचा उच्च दाबाखालील खडकाळ गाभा असणे शक्य आहे. गुरूच्या जलद परिवलनामुळे
त्याचा आकार गोलाकार न राहता विषुववृत्तावर थोडासा पण जाणवण्याइतका फुगलेला आहे.
गुरूचे बाह्य वातावरण वेगवेगळ्या उंचीवर वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये विभागलेले आहे.
यामुळे या विभागांच्या सीमा रेषांवर मोठी वादळे होत असतात. याचा परिणाम म्हणजे
गुरूवर दिसणारा प्रचंड लाल डाग. वास्तविकरीत्या हा डाग म्हणजे सतराव्या शतकापासून
चालत आलेले एक मोठे वादळ आहे. गुरूच्या भोवती एक अंधुक कडा आहे व शक्तिशाली
चुंबकीय क्षेत्र आहे. गुरूला कमीतकमी ६३ उपग्रह आहेत. यापैकी चार मोठ्या
उपग्रहांचा शोध गॅलिलियोने १६१० मध्ये लावला होता. त्यांना गॅलिलियन
उपग्रह म्हटले जाते. गॅनिमिड हा यापैकी सर्वांत मोठा उपग्रह असून
त्याचा व्यास बुध
ग्रहापेक्षाही जास्त आहे.
भौतिक गुणधर्म
आकारमान व वस्तुमान
गुरू ग्रह हा पृथ्वीवरून दिसणार्या आकाशातील चौथी ठळक वस्तू
आहे. कधीकधी मंगळ गुरूपेक्षा जास्त ठळक दिसतो. गुरू
ग्रहाचे वस्तुमान उर्वरित सर्व ग्रहांच्या एकत्रित वस्तुमानापेक्षा २.५ पट आहे.
त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ३१८ पट .असून त्याचा व्यास पृथ्वीच्या ११ पट आहे
त्याचे एकूण आकारमान पृथ्वीच्या १३०० पट आहे. त्यामुळे साहजिकच त्याच्या
गुरुत्वाकर्षणाचा सूर्यमालेच्या उत्क्रांतीवर बराच प्रभाव आहे. उदाहरणार्थ सर्व
ग्रहांच्या (अपवाद बुध ग्रहाची कक्षा) या गुरूच्या कक्षेशी मिळत्या
जुळत्या आहेत; बरेचसे कमी परिभ्रमण कालावधी असणारे
धूमकेतू हे गुरूभोवती परिभ्रमण करतात; लघुग्रह पट्ट्यामध्ये असणार्या कर्कवुड फटी (Kirkwood
gaps) या गुरूमुळेच आहेत.
सूर्यमालानिर्मितीनंतर बऱ्याच काळानंतर अंतर्ग्रहांवर झालेल्या अशनीवर्षावाला गुरू
ग्रहच कारणीभूत आहे. काहीजण सूर्यमालेचे वर्णन सूर्य, गुरू व इतर तुकडे असे करतात. तर
काहीजण त्याला सूर्यमालेचा झाडू म्हणतात.
गुरू सूर्यमालेमध्ये सर्वांत जास्त
वेगाने प्रदक्षिणा घालतो. त्याचा परिभ्रमण काळ हा दहा तासांपेक्षा किंचित कमी आहे.
इतक्या जास्त वेगाने परिभ्रमण केल्याने त्याच्या विषुववृत्तावर फुगवटा तयार झाला आहे. हा फुगवटा
पृथ्वीवरून साध्या दुर्बिणीने सहज दिसू शकतो.
गुरू व तपकिरी बटु
तारा
गुरूसारखा प्रचंड ग्रह व तपकिरी बटु यांच्यातील सीमारेषा पुसट आहे. परंतु
तपकिरी बटूचा वर्णपट विशिष्ट असा असतो. सध्याच्या व्याख्येनुसार एखाद्या आकाशस्थ
गोलाचे वस्तुमान जर गुरूच्या वस्तुमानापेक्षा १२ पट जास्त असले तर ते ड्युटेरियमचे
ज्वलन चालू करायला पुरेसे असते. असल्या वस्तूला तपकिरी बटू असे म्हणतात. जर
वस्तुमान त्यापेक्षा कमी असेल तर त्या वस्तूला ग्रह म्हणतात. गुरूचा व्यास
त्याच्या वस्तुमानाच्या प्रमाणात आहे असे समजले जाते. त्यामध्ये जर अजून
वस्तुमानाची भर पडली तर गुरुत्वाकर्षणामुळे तो आकुंचन पावेल व तापमान प्रचंड वाढून
त्याचे ताऱ्यात रूपांतर होईल. या विचारामुळे काही खगोलशास्त्रज्ञ त्याला एक
अयशस्वी तारा म्हणतात. खरे तर गुरू ग्रह हा तारा होण्यासाठी अजून ७५ पट मोठा
असायला हवा होता. लहानात लहान लाल बटू हा गुरूपेक्षा ३० टक्क्याने मोठा असतो.
मजेशीर गोष्ट म्हणजे, गुरूला जेवढी उष्णता सूर्यापासून मिळते त्याच्यापेक्षा जास्त
उष्णता तो उत्सर्जित करतो. ही जास्तीची ऊर्जा "केल्व्हिन-हेम्होल्ट्झ प्रक्रियेद्वारे तयार होते. या प्रक्रियेचा परिणाम
म्हणून गुरू दर वर्षी काही मिलिमीटरने आकुंचन पावत आहे. पूर्वी जेव्हा तो तरुण व
जास्त गरम होता तेव्हा तो आजच्यापेक्षा कितीतरी मोठा होता. शनी ग्रह तर गुरूपेक्षा
मोठा होता. शनीच्या कमी वस्तुमानामुळे कमी गुरुत्वबल व जास्त उष्णता असल्याने हे
दोन्हीही ग्रह जास्त फुगले (शनीच्या गाभ्यामध्ये कमी वस्तुमान असल्याने तो जास्त
फुगला). सर्वसाधारणपणे गाभ्यामध्ये जितके जास्त वस्तुमान असते तितका तो ग्रह
आकाराने लहान असतो.
ग्रहाची घडण
गुरू ग्रहाचा गाभा तुलनेने कमी खडकाळ
किंवा कठीण आहे. हा गाभा धातुरूप हायड्रोजनने (Metallic
Hydrogen) वेढला गेला आहे. त्याच्यासभोवती
द्रवरोप हायड्रोजन असून त्याच्यापलीकडे वायुरूप हायड्रोजनचे आवरण आहे. हायड्रोजनच्या
या सर्व अवस्थांमध्ये निश्चित अशी सीमा नाही त्या सर्व एकमेकांमध्ये जसजसे
गाभ्याकडे जावे तसतशा वायू ते द्रव व द्रव ते घन याप्रमाणे हलकेच मिसळलेल्या
आहेत.गुरू सदैव ढगांनी आच्छादलेला असतो. हे ढग अमोनियाच्या स्फटिकांपासून आणि अमोनियम
हायड्रोसल्फेटपासून बनलेले असतात. या ग्रहावर कठीण असा
पृष्ठभाग नाही. याच्यावर असणाऱ्या ढगांची घनता जसजसे केन्द्राकडे जावे तसतशी वाढत
जाते.
वातावरण
अणूंच्या संख्येनुसार गुरूचे वातावरण
सुमारे ९०% हायड्रोजन व १०% हेलियमने बनलेले आहे. गुरू ग्रहाच्या वातावरणात मिथेन,
पाण्याची वाफ, अमोनिया व खडक यांचे अंश आहेत. या व्यतिरिक्त कार्बन, इथेन, हायड्रोजन सल्फाइड, निऑन, ऑक्सिजन,फॉस्फिन व गंधक यांचेही अंश आहेत. बाह्य वातावरणात
अमोनियाचे स्फटिकही आढळून आले आहेत. अवरक्त किरण व अतिनीलकिरणांच्या साहाय्याने केलेल्या
अभ्यासाने बेन्झिन व अन्य कर्बोदक यांचेही अस्तित्व सापडले आहे. हे वातावरण शनी ग्रहाशी अत्यंत मिळतेजुळते आहे. पण युरेनस व
नेपच्यून यांचे वातवरण मात्र थोडे वेगळे आहे, त्यांच्यामध्ये हायड्रोजन व हेलियमचे प्रमाण कमी आहे.
प्रचंड तांबडा डाग
या ग्रहावरील सर्वांत परिचित अशी गोष्ट
म्हणजे त्यावर असणारा लाल डाग (The Great Red Spot). हा डाग म्हणजे पृथ्वीच्या आकारपेक्षा
मोठे वादळ आहे. हा डाग चार शतकांपूर्वी पहिल्यांदा जियोव्हानी
कॅसिनी व रॉबर्ट हूक यांनी पाहिला. याबाबतचे गणित असे
दर्शविते की हे वादळ आता शांत झाले असून तो डाग सदैव या ग्रहावर राहील. इसवी सन
२००० साली तीन लहान लाल डाग एकत्र येउन त्यांचे ओव्हल बीए (Oval
BA) नावाच्या मोठ्या डागात रूपांतर झाले.
नंतर त्याला लाल रंग येऊ लागला व तो आधीच्या लाल डागांप्रमाणेच दिसू लागला.
गुरूचे कडे
गुरूभोवती एक धूसर कडे आहे. त्याचे
तीन हिस्से आहेत. आतील हिस्सा हॅलो (halo) नावाचा धुलिकणांचा टॉरस,
त्यानंतरचे मुख्य तेजस्वी कडे व
सर्वांत बाहेरचे "गॉसॅमर" नावाचे कडे. हे कडे धुलिकणांनी
बनलेले आहेत, तर शनीचे कडे बर्फाचे आहे. मुख्य कडे बहुधा अद्रास्तिआ व मेटिस या उपग्रहांपासून उत्सर्जित झालेल्या
धुळीपासून बनले आहे. उपग्रहावर वापस पडणारे हे धुलिकण व लहान लहान खडक,
बहुतकरून, गुरूच्या गुरुत्वाकर्षणामुळे
त्याच्याभोवती फिरू लागतात. याचप्रकारे, थेबे आणि अमाल्थिआ हे उपग्रह गॉसॅमर कड्याचे दोन भिन्न
भाग बनविण्यास कारणीभूत आहेत.
नैसर्गिक उपग्रह
गुरू ग्रहाला एकंदर
६३ चंद्र आहेत. त्यांपैकी ठळकपणे दिसणारे चार उपग्रह गॅलिलियन
उपग्रह म्हणून ओळखले जातात -
·
गॅनिमीड
·
कॅलिस्टो
·
युरोपा
·
आयो
संशोधन
जमिनीवरून दुर्बिणीने केलेले गुरूचे निरीक्षण
१६१० मध्ये गॅलिलियोने दुर्बिणीद्वारे आयो, युरोपा, गनिमिड व कॅलिस्टो या गुरूच्या चार नैसर्गिक
उपग्रहांचा(चंद्रांचा)शोध लावला. गुरूच्या या चंद्रांना आता गॅलिलियन
उपग्रह म्हटले जाते. पृथ्वीसोडून इतर
ग्रहांच्या चंद्रांचे हे पहिले निरीक्षण मानले जाते. मात्र,
चिनी खगोलशास्त्राचा इतिहासकार झी झेझोंग याच्या मते, गॅलिलियोच्या आधी दोन हजार
वर्षांपूर्वीच गुरूच्या एका चंद्राचा शोध चिनी खगोलशास्त्रज्ञ गान डे याने इसवी सन पूर्व ३६२मध्ये
दुर्बिणीविना लावला होता.
गॅलिलियोचा शोध
आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे अवकाशातील सर्व वस्तू फक्त
पृथ्वीभोवतीच फिरत नाहीत असे सिद्ध झाले. या शोधामुळे कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री
सिद्धांताला दुजोरा मिळाला. या सिद्धान्ताप्रमाणे
ग्रह पृथ्वीभोवती फिरत नसून सूर्याभोवती फिरतात असे त्याने मांडले होते.
गॅलिलियोचा कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धांताला असलेल्या उघड पाठिंब्यामुळे तो
संकटात सापडला होता.
इ.स. १६६० मध्ये कॅसिनीने नवीन दुर्बिणीच्या साहाय्याने
गुरूवरील डाग व रंगीत पट्टे पाहिले. त्याला असेसुद्धा आढळले की गुरू हा ध्रुवाजवळ
थोडा चपटा आहे. कॅसिनी त्याच्या निरीक्षणांवरून गुरूचा परिभ्रमण काळ काढू शकला. १६९०
मध्ये कॅसिनीला आढळले की गुरूच्या वातावरणाचा परिभ्रमणाचा वेग गुरूच्या वेगापेक्षा
वेगळा आहे.
गुरूवरील राक्षसी
तांबडा डाग हा १६६४ मध्ये रॉबर्ट हूक व १६६५ मध्ये कॅसिनीने बघितला होता
असे मानले जाते, पण याबाबत जाणकारांमध्ये वाद आहेत.
ज्ञात माहितीनुसार गुरूच्या राक्षसी तांबड्या डागाचे पहिले चित्र सॅम्यूअल
हेनरिक श्वाबयाने १८३१ मध्ये बनविले आहे. हा डाग १६६५ ते १७०८ दरम्यान अनेकदा गायब झाल्याचे नोंदवण्यात आले
आहे. १८७८ मध्ये तो बराच ठळक बनला तसेच १८८३ आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तो
परत फिका होत गेल्याचे नोंदवण्यात आले आहे.
गिओवानी
बोरेली व कॅसिनी या दोघांनीही काळजीपूर्वक
गुरूच्या चंद्रांच्या गतीचे तक्ते बनविले होते. त्यांच्या साह्याने चंद्र केव्हा
गुरूच्या मागे जातील तसेच केव्हा गुरूच्या पुढे येतील याचे अचूक भाकित करणे शक्य
होते. मात्र १६७० दरम्यान जेव्हा गुरू पृथ्वीच्या दृष्टीने सूर्याच्या पलीकडील
बाजूला होता तेव्हा असे आढळले, की या नोंदींनुसार केलेली भाकिते खर्या निरीक्षणांपेक्षा १७
मिनिटे मागे होती. ओले रोमरयाने असे मांडले की आपल्याला
वस्तू तात्काळ दिसत नाहीत. प्रकाशाला आपल्यापर्यंत यायला काही वेळ लागतो. कॅसिनीने
या शोधाचा सुरुवातीला स्वीकार केला नव्हता. मात्र नंतर हा सिद्धांत वापरून
प्रकाशाच्या वेगाचे मापन करण्यात आले.
१८९२ मध्ये इ. इ.
बर्नार्ड याने कॅलिफोर्निया येथील लिक वेधशाळेत गुरूचा पाचवा चंद्र शोधून काढला. हा
छोटा उपग्रह शोधून काढल्यामुळे त्याच्या वेधक नजरेचे कौतुक झाले व तो प्रसिद्ध झाला.
या चंद्राला नंतर अमाल्थिआ हे नाव देण्यात आले. प्रत्यक्ष बघून शोधण्यात आलेला हा
शेवटचा उपग्रह आहे. यानंतर व १९७९ मधील व्हॉयेजर १ मोहिमेपूर्वी गुरूचे अजून आठ उपग्रह
शोधण्यात आले होते.
अंतराळयानांनी केलेले संशोधन
|
गुरूजवळून
गेलेली अंतराळयाने |
||
|
अंतराळयान |
निकटतम
दिन |
अंतर |
|
पायोनियर १० |
डिसेंबर ३, १९७३ |
१,३०,००० कि.मी. |
|
पायोनियर ११ |
डिसेंबर ४, १९७४ |
३४,००० कि.मी. |
|
व्हॉयेजर १ |
मार्च ५, १९७९ |
३,४९,००० कि.मी. |
|
व्हॉयेजर २ |
जुलै ९, १९७९ |
५,७०,००० कि.मी. |
|
युलिस्सेस |
फेब्रुवारी १९९२ |
४,०९,००० कि.मी. |
|
फेब्रुवारी २००४ |
२४,००,००,००० कि.मी. |
|
|
कॅसिनी |
डिसेंबर ३०, २००० |
१,००,००,००० कि.मी. |
|
न्यू होरायझन्स |
फेब्रुवारी २८, २००७ |
२३,०४,५३५ कि.मी. |
१९७३ पासून अनेक
अंतराळयाने त्यांच्या प्रवासात गुरूजवळून गेली आहेत. पायोनियर अंतराळयानांनी सर्वप्रथम गुरूची व त्याच्या
उपग्रहांची जवळून छायाचित्रे घेतली. या यानांना असे आढळून आले की गुरूपासून
अपेक्षेपेक्षा जास्त किरणोत्सार होत आहे. पण दोन्ही याने त्या वातावरणात टिकाव धरू
शकली. या यानांच्या कक्षेचा उपयोग जोव्हियन प्रणालीच्या (गुरू व त्याचे उपग्रह)
एकत्रित वस्तुमान निश्चित करण्यासाठी करण्यात आला तसेच यानावरून येणार्या रेडिओ
संदेशांना होणारा अडथळा मोजून गुरूचा व्यास मोजण्यात आला.
सहा वर्षानंतरच्या व्हॉयेजर
प्रकल्पाने गुरूच्या कड्याचा शोध लावला तसेच
गॅलिलियन उपग्रहांबाबत अधिक माहिती पुरविली. या प्रकल्पातील यानांना आयो वर जिवंत
ज्वालामुखी सापडले. यानंतर गुरूजवळून जाणारी मोहिम म्हणजे युलिस्सेस.
या मोहिमेतील पहिल्या यानाला
सूर्याभोवतीच्या ध्रुवीय कक्षेत टाकण्यासाठी गुरूजवळून नेण्यात आले. यादरम्यान
यानाने गुरूच्या मॅग्नेटोस्फिअरचा (magnetosphere) अभ्यास केला. मात्र यानावर कॅमेरा नसल्यामुळे गुरूची छायाचित्रे
काढता आली नाहित. या मोहिमेतील दुसरे यान गुरूपासून बऱ्याच दूरवरून गेले.
इ.स. २००० मध्ये शनीकडे निघालेले कॅसिनी यान गुरूजवळून गेले. या यानाने गुरूची
आतापर्यंतची सर्वांत चांगली छायाचित्रे काढली आहेत. तसेच या यानाने गुरूचा उपग्रहहिमालियाची काहीशी धूसर छायाचित्रेसुद्धा घेतली. यानंतर प्लूटोकडे निघालेले न्यू
होरायझन्स यान गुरूजवळून नेण्यात आले. यादरम्यान
प्लूटोकडे फेकण्यासाठी गुरूच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग गोफणीसारखा करून घेण्यात आला. हे यान फेब्रुवारी २८,२००७ रोजी गुरूच्या सर्वाधिक जवळ होते. यानाने आयोवरील ज्वालामुखींमधून
निघणार्या प्लाझ्माचे मोजमाप केले तसेच गॅलिलियन उपग्रह व हिमालिया व एलारा या उपग्रहांचे निरीक्षण केले. जोव्हियन प्रणालीचे निरिक्षण सप्टेंबर ४, २००६ पासून चालू झाले होते.
गॅलिलियो मोहीम
गॅलिलियो हे आतापर्यंत सोडण्यात आलेले
गुरूभोवती फिरणारे एकमेव अंतराळयान आहे. हे यान गुरूभोवतीच्या कक्षेत डिसेंबर ७,१९९५ रोजी पोहोचले. पुढील सात वर्षे हे यान
गुरूभोवती फिरत होते. यादरम्यान यान अनेकदा गॅलिलियन उपग्रह वअमाल्थिया यांच्या जवळून गेले. तसेच यानाला १९९४
मध्ये शुमाकर-लेवी ९
धूमकेतू व गुरूची टक्कर बघता आली. जरी या
यानाकडून जोव्हियन प्रणालीबद्दल खूप माहिती मिळाली असली तरी यानावरील रेडिओ अँटेना
योग्यरीत्या चालू न झाल्यामुळे यानाच्या क्षमतेवर काहीशा मर्यादा आल्या.
जुलै १९९५ मध्ये
यानावरून एक प्रोब सोडण्यात आला, जो डिसेंबर ७ ला गुरूच्या वातावरणात शिरला. गुरूच्या वातावरणात १५०
कि.मी.चा प्रवास करून हा प्रोब गुरूच्या उच्च वातावरणीय दाबाखाली (पृथ्वीच्या २२
पट) आणि तापमानाखाली (सुमारे १५३°C)नष्ट झाला. त्यापूर्वी त्याने सुमारे ५७.६ मिनिटे माहिती गोळा केली
होती. तो प्रोब बहुधा वितळला असावा किंवा
त्याचे बाष्पीकरणसुद्धा झाले असणे शक्य आहे. जेव्हा सप्टेंबर २१,२००३ रोजी यानाला ५० कि.मी. प्रतिसेकंद
वेगाने मुद्दाम गुरूच्या वातावरणात ढकलण्यात आले, तेव्हा गॅलिलियो यानाचा अंतही अशाच
प्रकारे झाला. यानाची आयोशी होणारी टक्कर टाळण्यासाठी असे करण्यात आले होते. आयोवर
जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे व शास्त्रज्ञांना त्याला हानी
पोहोचवायची नव्हती.
भविष्यातील मोहिमा
ध्रुवीय कक्षेतून
गुरूचा अभ्यास करण्यासाठी नासा नवीन मोहिमेची आखणी करत आहे. या मोहिमेला जूनो हे नाव देण्यात आले असून,
त्याचे प्रक्षेपण २०११ मध्ये करण्यात
येणार आहे. तसेच गुरूचा उपग्रह युरोपावर द्रवरूप समुद्र असण्याची शक्यता
असल्यामुळे नासाने एक मोहीम केवळ यासाठीच नियोजित केली होती. जिमो (ज्युपिटर आइसी मून्स ऑर्बिटर) या
नावाचे हे यान २०१२ मध्ये प्रक्षेपित करण्यात येणार होते. मात्र ते थोडे जास्तच
महत्त्वाकांक्षी ठरवून रद्द करण्यात आले आहे. युरोपातील जोवियन युरोपा
ऑर्बिटर मोहीम सध्या विचाराधीन आहे,
मात्र त्याच्या प्रक्षेपणाची तारीख
अजून ठरविण्यात आलेली नाही.
जीवसृष्टीची शक्यता
गुरूवर जीवसृष्टी
असणे शक्य नाही कारण तेथील वातावरणात पाणी नगण्य आहे आणि गुरुचा स्थायू पृष्ठभाग
प्रचंड दाबाखाली आहे.१९७६ मध्ये व्हॉयेजर यान सोडण्याआधी कार्ल सागन यांनी अमोनियावर आधारित जीव गुरूवर असण्याची कल्पना
मांडली होती; पण यासंबंधी कोणताही पुरावा सापडला
नाही.
ट्रोजन लघुग्रह
गुरुच्या
चंद्रांप्रमाणेच गुरुचे गुरुत्वाकर्षण
बल बऱ्याच लघुग्रहांना नियंत्रणात ठेवते.
हे लघुग्रह गुरूच्या सूर्याभोवतीच्या कक्षेत पुढील व मागील लाग्रांजियन
बिंदूंच्या भागात पसरले आहेत. यांना 'ट्रोजन
लघुग्रह' असे संबोधले जाते. इलियाड या प्राचीन ग्रीक महाकाव्याच्या
स्मरणार्थ यांचे वर्गीकरण ग्रीक आणि रोमन यांत करण्यात आले आहे. यातील पहिला
लघुग्रह ५८८ अकिलीझ मॅक्स वुल्फ यांनी १९०६ साली शोधला. सर्वांत मोठा ट्रोजन
लघुग्रह ६२४ हेक्टर हा आहे.
धूमकेतूची धडक
जुलै
१६ ते जुलै २२, १९९४ च्या दरम्यान शुमाकर-लेव्ही
९ धूमकेतूचे ९ तुकडे गुरूच्या दक्षिण
गोलार्धात धडकले. गुरूच्या प्रचंड वस्तुमानामुळे आणि सूर्यमालेतील त्याच्या आतील
स्थानामुळे गुरूवर इतर ग्रहांपेक्षा जास्त धूमकेतूंची धडक होते असे मानले जाते.
मानवी संस्कृतीमध्ये गुरू
गुरू ग्रह प्राचीन
काळापासून मानवाला ज्ञात आहे. रात्री हा ग्रह दूर्बिणिविना दिसू शकतो तर काही वेळा
दिवसासुद्धा सूर्य अंधूक असला तर गुरू दिसतो. बाबिलोनियन
संस्कृतीमध्ये गुरू हा त्यांचा देव मार्दुक याचे प्रतिक मानला जात असे. तसेच
गुरूच्या जवळपास १२ वर्षाच्या परिवलन काळाचा उपयोग त्यांच्या राशींशी निगडित
नक्षत्रे ठरविण्यासाठी केला जात असे.
रोमन संस्कृतीमध्ये ज्युपिटर
देवाच्या नावावरून गुरूला ज्युपिटर हे नाव दिले गेले होते. जोव या नावानेसुद्धा ओळखला जाणारा हा देव
रोमन संस्कृतीतील मुख्य देव होता. गुरूचे खगोलशास्त्रीय
चिन्ह ,
ज्युपिटरच्या हातातील वज्रास्त्र
(विजेसारखे दिसणारे अस्त्र, भारतीय संस्कृतीमध्ये इंद्राजवळ वज्रास्त्र होते.) दर्शविते. ग्रीक
देवता झ्यूस सुद्धा गुरूशी संबंधित आहे. गुरूसाठी
वापरण्यात येणारेझिनो हे विशेषण झ्यूसवरून आले आहे.
जोवियन हे विशेषणसुद्धा गुरूला लावण्यात
येते. भारतीय तसेच पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्रामध्ये गुरूला प्रमुख स्थान आहे,
आनंदी, सुखी असे गुरूचे गुणधर्म ज्योतिषात
सांगितले जातात. इंग्रजीमधील जोवियल (jovial)
हे आनंदी या अर्थाने वापरण्यात येणारे विशेषण
यावरूनच आले आहे. हिंदू ज्योतिषामध्ये गुरूला बृहस्पती म्हटले जाते. बृहस्पती हा देवांचा शिक्षक होता. त्यावरून या
ग्रहाचे नावगुरू ठेवण्यात आले आहे. गुरूचा दुसरा अर्थ 'जड, बलशाली' असा होतो.
चिनी,
जपानी, कोरियन व व्हियेतनामी संस्कृतीमध्ये
गुरूला लाकडांचा तारा (wood
star) म्हटले जाते. जो चिनी संस्कृतीतील पाच मूलतत्वांशी
संबंधित आहे. ग्रीक त्याला फेथॉन म्हणत, ज्याचा अर्थ 'दीप्तीमान'
(blazing) असा होतो. इंग्रजीतील 'थर्स डे'
(Thursday) हे नाव जर्मॅनिक
दंतकथेतील थोरवरून आले आहे, जो गुरूशी संबंधित आहे.