त्रिपुरा & उत्तराखंड - Scholarship Exam

 

त्रिपुरा

त्रिपुरा (बांग्ला: ত্রিপুরা) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. याच्या उत्तरेला व पश्चिमेला बांग्लादेश, ईशान्येला आसाम व पूर्वेला मिझोराम ही राज्ये आहेत. त्रिपुराचे क्षेत्रफळ १०.४९२ चौ.किमी एवढे आहे. आगरताळा हे त्रिपुराच्या राजधानीचे व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या राज्याची लोकसंख्या ३६,७१,०३२ एवढी आहे. मणिपुरी ही त्रिपुराची प्रमुख भाषा आहे. तांदूळ, डाळ, ताग, कापूस ही त्रिपुराची प्रमुख पिके आहेत. राज्याची साक्षरता ८७.७५ टक्के आहे. गोमती  खोवाई या येथील प्रमुख नद्या आहेत. त्रिपुरा राज्यात ४ जिल्हे आहेत.

उत्तराखंड

उत्तराखंड हे भारताच्या उत्तरे कडील एक महत्वाचे राज्य आहे. या राज्याला देवभूमी या नावाने सुध्दा ओळखले जाते. उत्तराखंडचे क्षेत्रफळ ५३,४८३ चौ.किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या १,०१,१६,७५२ एवढी आहे. डेहराडून ही उत्तराखंड ची राजधानी आहे. हिंदी  गढवाली ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदूळ, गहू  मका ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तराखंड ची साक्षरता ७९.६३ टक्के आहे. गंगा, यमुना, रामगंगा येथील प्रमुख नद्या आहेत. अनेक धार्मिक ठिकाणे व थंड हवेची ठिकाणे यामुळे येथे पर्यटन व्यवसाय भरभराटीस आला आहे. केदारनाथ, बद्रिनाथ, हरिद्वार,ऋषिकेश ही येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहेत. उत्तराखंड राज्यात १३ जिल्हे आहेत.