हैदराबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी
याच्या ‘रजाकार’ या दहशतवादी संघटनेने मराठवाडा हिंदू जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा
विरोध करणे आवश्यक झाले होते. या साठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस
म्हणून स्वामीजी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर,
१९३८ रोजी स्वामीजी कार्यकर्त्यांसह
सत्याग्रहासाठी हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते
सुमारे चार माहिने कारावासत् होते. यानंतर निजामाने जातीय दंगली घडवल्या व जनतेवर
अत्याचारांना प्रोत्साहन दिले. यामुले सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम
केले. याचा निजामाला इतका त्रास झाला की त्याने तडजोड मान्य करून संघटनेवरील बंदी
हटवली. ‘हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व
संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंदतीर्थ यांनी सरकार आणि जनतेला
दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या
विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हीजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत
ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे,
शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई
श्रॉफ हे तरूण स्वातंत्र्यसैनिक होते.
हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते.
तत्कालीन गृहमंत्री सरदार
वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र कारवाई करून निजामाला
शरण आणले. हैदराबाद
संस्थान १७ सप्टेंबर १९७४ रोजी भारतात विलिन
झाले. स्वातंत्र्यानंतरच्या दोन निवडणुकांत गुलबर्गा व औरंगाबाद येथून ते लोकसभेवर निवडून गेले होते.
१९७२ साली त्यांचे हैद्राबाद येथे निधन झाले.
स्मृती
एस. एम्. जोशींनी ‘प्रादेशिक ऐक्य व
लोकशाहीसाठी स्वामीजींचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल’ असा त्यांच्या
कार्याचा गौरव केलेला आहे.
·
यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नांदेड येथील
मराठवाडा विद्यापीठाला स्वामी
रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ असे
नाव दिले.
·
अंबाजोगाई येथे
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व्यंकटराव डावळे प्रतिष्ठान व
राज्य सरकार यांच्यातर्फे चालविले जाते.
·
उस्मानाबाद येथे
स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला चालवली जाते.
हैदराबाद पोलिस
कारवाई
भारतीय हैदराबाद मुक्तिसंग्रातील हैदराबाद पोलिस कारवाई तथा ऑपरेशन पोलो ही भारतीय सैन्याने सप्टेंबर १९४८मध्ये हैदराबाद
राज्याविरुद्ध केलेल्या हालचाली व त्यानंतरच्या घटना
होत्या. या कारवाईद्वारे भारताने हैदराबाद राज्य स्वतःत विलीन करून घेतले.
पार्श्वभूमी
महात्मा
गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची स्वातंत्र्य
आंदोलनाची भूमिका केवळ परकीय राजवटीस घालवण्याचीच नव्हती तर भारतातील राजे
राजवटींच्या एवजी सर्वसामान्यांची लोकशाही स्थापन व्हावी अशी भूमिका होती या
भूमिकेतून स्वतंत्र भारत राज्यातून सरंजामशाहीचा अंत झाला पाहिजे अशा हेतूने स्वतंत्र
भारतात संस्थानिकांचे विलिनीकरणाची काँग्रेसची असधिकृत भूमिका होती,या भूमिकेचे अजून एक कारण भारतीय
इतिहासात उपमहाद्विपातील असंख्य राजे ते सरंजामशही संस्थानिक यांच्यातील संघर्षाचा
परकीय आक्रमकांना फायदा मिळत गेल्याच्या इतिहासाची पुर्नावृत्ती होऊ नये असेही
होते.स्वतंत्र भारताच्या रचने नंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थानांशी
बोलणीकरून विलीन करून घेतले
हैदराबादचे संस्थान हैदराबाद राज्य
ब्रिटीश राजवटीच्या अस्ताच्या वेळी पर्यंत टिकुन असलेले केवळ सर्वात मोठे स्वायत्त
संस्थानिक राज्यच नव्हते तर उत्तर आणि दक्षीण भारताच्या मधोमध पसरले होते.त्याचे
स्वतंत्र राहणे भारताच्या एकसंघतेस कमकुवत ठरवणारे होते.पण त्याही पलिकडे हैदराबाद
संस्थानातील जनता स्वतःच्या चळवळी आणि आंदोलनांना भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचाच
एजक भाग समजत आली होती
तत्कालीन निजामाने सरदार वल्लभाईंच्या
सामिलीनीकरण प्रस्तावांची केवळ अवहेलनाच केली नाहीतर हैदराबाद राज्यातील जनतेने
चालविलेल्या लोकशाहीच्या मागणीच्या तसेच भरतीय संघराज्यात सामील होण्याकरिता
चालविलेल्या जन आंदोलनास चिरडण्याकरिता तत्कालीन निजामाने रजाकार नावाच्या अमानुष
संघेटनेकरवी अनन्वित अत्याचारांचा कळस गाठला गेलेला होता.हे अत्याचार एवढे अनन्वित
होते की हैदराबाद
मुक्तिसंग्रातील काँग्रेस कार्यकर्यांच्या शस्त्रे
हाती घेऊ देण्याच्या विनंतीस स्वतः महात्मा गांधींनी सुद्धा संमती दिली. या
पार्स्वभूमीवर भारत सरकारने ऑपरेशन पोलो' अंतर्गत तत्कालीन हैदराबाद राज्य
सामिल करून घेतले.
पोलिस कारवाई
हैदराबाद
मुक्तीसंग्रामाची अखेर पोलिस कारवाईने झाली. निजामी शासनसत्तेचा प्रतिकार
१०९ तासात संपुष्टात आला. ही पोलिस कारवाई म्हणजे लष्करी कारवाई होती. तिला
आॅपरेशन पोलो नाव दिले होते. त्याआधी सीमेवर घुसखोरी करणार्या निजामी लष्कर व
रझाकारी टोळ्यांविरुध्द आॅपरेशन कबड्डी चालवले गेले होते. इ.स. १९४८च्या
आॅगस्टच्या तिसर्या आठवड्यात आॅपरेशन पोलोची तयारी सुरु झाली. या मोहिमेसाठी
फर्स्ट ग्वालियर लान्सर्स, मैसूर लान्सर्स, मेवाड इन्फंट्री, फोर्थ ग्वालियर इन्फंट्री, राजाराम रायफल्स,
फर्स्ट मैसूर इन्फंट्री यातील दले
तैनात केली होती. या लष्कराला हवाई दलाचे व रणगाड्यांचे सहाय्य होते.
सदर्न कमांडचे सरसेनापती लेफ्टनंट
जनरल राजेंद्रसिंह हे पुण्याच्या मुख्यालयातून सर्व सूत्रे हलवीत होते. वेगवेगळ्या
विभागांसाठी दलप्रमुख होते. सोलापूरहून शिरलेल्या तुकड्यांचे नेतृत्व मेजर जनरल
जयंतीनाथ चौधरी यांच्याकडे होते तर औरंगाबादच्या बाजूने शिरलेल्या तुकड्यांचे
नेतृत्व मेजर जनरल डी.एस. बार यांच्याकडे होते. हैदराबाद संस्थानात पाच दिशांनी
लष्कर शिरले. वायव्येला औरंगाबादकडून, पश्चिमेला सोलापूरकडून, ईशान्येला आदिलाबादकडून, दक्षिणेला कर्नुलकडून तर आग्नेयेला विजयवाड्याकडून लष्कराने
संस्थानी हद्दीत प्रवेश केला.
१३ सप्टेंबर, इ.स. १९४८ रोजी पहाटे ४ वाजता कारवाई
सुरु झाली. पहिल्या तासातच तुळजापूर सर झाले. नळदुर्गला जोरदार प्रतिकार झाला.
तेथील पूल निजामी सैन्याने उडवून देण्यापूर्वीच भारतीय लष्कराने कब्जात घेतला.
सेनेने औरंगाबादच्या बाजूला जालना रस्त्याने मुसंडी मारली. परभणी जिल्ह्यात
कन्हेरगाव जिंकले. कर्नुल विभागात तुंगभद्रेवरील महत्त्वाचा पूल ताब्यात आला. आदिलाबाद
भागात बल्लारशहाचा पूलही ताब्यात आला. वरंगळ व बीदरच्या विमानतळांवर बाँबफेक केली.
१४ सप्टेंबरला दौलताबाद मुक्त केले. जालनाही मुक्त केले.
सोलापूरकडून शिरलेल्या तुकड्या सिकंदराबादच्या अर्ध्या वाटेवर पोहोचल्या.
उस्मानाबाद व येरमाळाही ताब्यात आले. विजयवाड्याच्या फौजा सिकंदराबादपासून साठ
मैलांवर पोहोचल्या. याच दिवशी कर्नुल येथील रझाकारांचा प्रतिकारही मोडून काढण्यात
आला व वरंगळ आणि बीदरच्या विमानतळांवर पुन्हा हल्ला करण्यात आला.
१५ सप्टेंबरला औरंगाबादवरील चढाई
फत्ते झाली. हुमनाबाद पडले. शहागडच्या पुलावर कब्जा झाला. जनरल चौधरींची तुकडी
सिकंदराबादपासून नव्वद मैलांवर पोहोचली.